IPL 2024 Auction Live Updates : मिचेल स्टार्क ठरला आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू, पाहा किती मिळाली किंमत?
IPL 2024 Auction Live Updates: पहिल्यांदाच भारताबाहेर आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या लिलावामध्ये 333 खेळाडूंचं रजिस्ट्रेशन झालं असलं तरी यातील 33 खेळाडूंना विकत घेतलं जाणार आहे.
IPL 2024 Auction Live Updates: आयपीएल चाहत्यांसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. सर्वांना उत्सुकता असलेल्या आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी मिनी लिलाव आज होणार आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताबाहेर हा लिलाव होणार आहे. दुबईमधील या मिनी-लिलावात एकूण 333 खेळाडू सहभागी होणार आहेत. 10 संघांना 333 पैकी 77 खेळांडूंना आपल्या संघात निवडता येणार आहे. त्यामुळे कुठल्या खेळाडूचं नशीब चमकणार तर कोणाला डच्चू मिळणार हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे.
Latest Updates
यश दयाल आता आरसीबीमध्ये...
यश दयालला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 5 कोटींना विकत घेतलंय. यश दयाल गेल्या मोसमात गुजरात टायटन्सचा भाग होता. रिंकू सिंगने अखेरच्या षटकात यशच्या चेंडूवर पाच षटकार ठोकले होते.
दिल्ली कॅपिटल्सचा नवा डाव
कुमार कुशाग्र या अनकॅप खेळाडूला दिल्ली कॅपिटल्सने करारबद्ध केलं आहे. कुमारची मूळ किंमत 20 लाख होती. दिल्ली कॅपिटल्सने 7.2 कोटींची किंमत मोजलीये.
भारताचा अनकॅप खेळाडू समीर रिझवी (Sameer Rizvi) याला धोनीच्या चेन्नईने तब्बल 8.4 कोटींना खरेदी केलं आहे. येत्या हंगामात समीर रिझवी चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळणार आहे.
शाहरूख गुजरातकडे
शाहरुख खान गुजरात टायटन्सला ७.४० कोटी मोजून संघात समाविष्ठ केलंय.
लिलावात कोणत्या खेळाडूंना किती मिळाली किंमत?
1. रोवमैन पॉवेल (वेस्टइंडीज)- 7.40 करोड़, राजस्थान रॉयल्स (बेस प्राइस- 1 करोड़)
2. हैरी ब्रूक (इंग्लैंड)- 4 करोड़, दिल्ली कैपिटल्स (बेस प्राइस- 2 करोड़)
3. ट्रेविस हेड (ऑस्ट्रेलिया)- 6.80 करोड़, सनराइजर्स हैदराबाद (बेस प्राइस- 2 करोड़)
4. वानिंदु हसारंगा (श्रीलंका)- 1.50 करोड़, सनराइजर्स हैदराबाद (बेस प्राइस- 1.5 करोड़)
5. रचिन रवींद्र (न्यूजीलंड)- 1.80 करोड़, चेन्नई सुपर किंग्स (बेस प्राइस- 50 लाख)
6. शार्दुल ठाकुर (भारत)- 4 करोड़, चेन्नई सुपर किंग्स (बेस प्राइस- 2 करोड़)
7. अजमतुल्लाह उमरजई (अफगानिस्तान)- 50 लाख, गुजरात टाइटन्स (बेस प्राइस- 50 लाख)
8. पैट कमिंस (ऑस्ट्रेलिया)- 20.50 करोड़, सनराइजर्स हैदराबाद (बेस प्राइस- 2 करोड़)
9. गेराल्ड कोएत्जी (साउथ अफ्रीका)- 5 करोड़, मुंबई इंडियंस (बेस प्राइस- 2 करोड़)
10. हर्षल पेटल (भारत)- 11.75 करोड़, पंजाब किंग्स ((बेस प्राइस- 2 करोड़)
11. डेरिल मिचेल (न्यूजीलैंड)- 14 करोड़, चेन्नई सुपर किंग्स (बेस प्राइस- 1 करोड़)
12. क्रिस वोक्स (इंग्लैंड)- 4.20 करोड़, पंजाब किंग्स (बेस प्राइस- 2 करोड़)
13. ट्रिस्टन स्टब्स (साउथ अफ्रीका)- 50 लाख, दिल्ली कैपिटल्स (बेस प्राइस- 50 लाख)
14. केएस भरत (भारत)- 50 लाख, कोलकाता नाइट राइडर्स (बेस प्राइस- 50 लाख)
15. चेतन सकारिया (भारत)- 50 लाख, कोलकाता नाइट राइडर्स (बेस प्राइस- 50 लाख)
16. अल्जारी जोसेफ (वेस्टइंडीज)- 11.50 करोड़, रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु (बेस प्राइस- 1 करोड़)
17. उमेश यादव (भारत)- 5.80 करोड़, गुजरात टाइटन्स (बेस प्राइस- 2 करोड़)
18. शिवम मावी (भारत)- 6.40 करोड़, लखनऊ सुपर जायंट्स (बेस प्राइस- 50 लाख)
19. मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया)- 24.75 करोड़, कोलकाता नाइट राइडर्स (बेस प्राइस- 2 करोड़)
20. जयदेव उनादकट (भारत)- 1.6 करोड़, सनराइजर्स हैदराबाद (बेस प्राइस- 50 लाख)
21. दिलशान मदुशंका (श्रीलंका)- 4.60 करोड़, मुंबई इंडिंयंस (बेस प्राइस- 50 लाख)IPL 2024 Auction Live Updates: हैदराबादच्या संघातून खेळणार उनाडकट
50 लाख रुपयांची बेस प्राईज असणाऱ्या जयदेव उनाडकटवर दिल्ली आणि हैदराबादच्या संघांकडून बोली लावण्यात आली. ज्यानंतर अखेर दिल्लीनं सरशी घेत त्याच्यावर 1.6 कोटींची बोली लावत लिलाव जिंकला.
IPL 2024 Auction Live Updates: Mitchell Starc वर ऐतिहासिक बोली
मुंबई आणि दिल्लीमागोमाग कोलकात्याच्या संघाकडूनही स्टार्कसाठी बोली लावण्यात आली. मोठ्या संघांकडून त्याच्यावर लावण्यात आलेल्या बोलीचा आकडा 20 कोटींच्या पलिकडे गेला आणि सरतेशेवटी सर्वाधिक 24.75 कोटी इतकी मोठी रक्कम देत केकेआरच्या संघात या खेळाडूला स्थान मिळालं. आयपीएलच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी बोली ठरली असून स्टार्कनं अवघ्या तासाभरात पॅट कमिन्सचा विक्रम मोडला.
IPL 2024 Auction Live Updates: लाखोंची बेस व्हॅल्यू असणाऱ्या खेळाडूवर कोट्यवधींची बोली
50 लाख रुपयांची बेस व्हॅल्यू असणाऱ्या शिवम मावी या खेळाडूसाठी बंगळुरू आणि लखनऊच्या संघांनी बोली लावली. ज्यानंतर तब्बल 6.40 कोटी रुपयांमध्ये त्याची लखनऊच्या संघासाठी निवड झाली.
IPL 2024 Auction Live Updates: उमेश यादव कोणत्या संघात?
2 कोटी रुपयांची बेस वॅल्यू असणाऱ्या उमेश यादववर बोली लावण्यासाठी हैदराबाद आणि गुजरातच्या संघांनी इच्छा दाखवली. ज्यानंतर गुजरातच्या संघानं ही बोली जिंकत उमेश यादववर 5.8 कोटी रुपयांची बोली लावली.
IPL 2024 Auction Live Updates: 1 कोटींवरून 11 कोटींची किंमत मिळालेला खेळाडू
Alzarri Joseph या खेळाडूवर 1 कोटी रुपयांपासून बोली लावण्यास सुरुवात झाली. चेन्नई सुपरकिंग्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ, बंगळुरू या संघांकडून त्याच्यावर बोली लावण्यात आली. ज्यानंतर आरसीबीनं या खेळाडूवर 11.5 कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघासाठी निवडलं.
IPL 2024 Auction Live Updates: केकेआरमध्ये सकारिया
2 कोटी रुपये इतकी बेस प्राईज असणाऱ्या लॉकी फर्ग्यूसनवरही कोणत्या संघानं बोली लावली नाही. तर, 50 लाखांच्या बेस प्राईजवर चेतन सकारियाला केकेआरनं संघात स्थान दिलं आहे.
IPL 2024 Auction Live Updates:Tristan Stubbs वर लाखोंची बोली
दिल्ली कॅपिटल्सकडून Tristan Stubbs साठी तब्बल 50 लाख रुपये मोजण्यात आले. तर, केएस भारतवर 50 लाखांची बोली लावत केकेआरनं त्याला संघात कायम ठेवलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या Josh Inglis वर 2 कोटी इतक्या मूळ किमतीत बोली लावण्यात आली. पण, त्याला कोणत्याही संघानं पसंती दिली नाही.
IPL 2024 Auction Live Updates : 'हे' खेळाडू पहिल्या प्रयत्नात राहिले अनसोल्ड
1 रिले रोसो - (दक्षिण आफ्रिका) – मूळ किंमत रु 2 कोटी
2 करुण नायर (भारत) – मूळ किंमत 50 लाख रुपये
3 स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) – मूळ किंमत रु 2 कोटी
4 मनीष पांडे (भारत) – मूळ किंमत 50 लाख रुपयेIPL 2024 Auction Live Updates : 'या' खेळाडूंवर पैशांची बरसात, विदेशी खेळांडूंचा बोलबाला
1 पॅट कमिन्स- 20 कोटी 50 लाख - सनरायझर्स हैदराबाद
2 डेरिल मिशेल - 14 कोटी - चेन्नई सुपर किंग्स
3 हर्षल पटेल -11.75 कोटी -पंजाब किंग्ज
4 रोव्हमन पॉवेल -7.40 कोटी - राजस्थानIPL 2024 Auction Live Updates : वोक्स पंजाब किंग्जमध्ये सहभागी
वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सला पंजाब किंग्जने 4.20 कोटी रुपयांमध्ये आपल्या टीममध्ये सहभागी करुन घेतलं आहे.
IPL 2024 Auction Live Updates : मिचेल धोनीच्या संघासोबत
डेरिल मिशेलला चेन्नई सुपर किंग्सने 14 कोटींना विकत घेतलंयय. मिशेलने वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध दोन सेंच्युरी ठोकल्या होत्या.
IPL 2024 Auction Live Updates : हर्षल पंजाबच्या संघातून खेळणार
हर्षल पटेलला पंजाब किंग्जने 11.75 कोटी रुपयांना बोली लावून आपल्या संघात सहभागी करुन घेतलं आहे. गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज हर्षलसाठी रस्सीखेच पाहिला मिळाली.
IPL 2024 Auction Live Updates : कोएत्झी मुंबईकडून खेळणार आहे.
जेराल्ड कोएत्झीला मुंबई इंडियन्सने 5 कोटींना विकत घेतलंय. कोएत्झीची मूळ किंमत 2 कोटी रुपये एवढी होती.
IPL 2024 Auction Live Updates : पॅट कमिन्सने रचला इतिहास, 20.50 कोटींमध्ये 'या' संघात सहभागी
पॅट कमिन्स हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. 20.50 कोटींमध्ये त्याला हैदराबादने आपल्या संघात सहभागी केलं आहे. कमिन्सला विकत घेण्यासाठी आरसीबीनेही धडपड केली, पण सनरायझर्सने बाजी मारली.
IPL 2024 Auction Live Updates : ओमरझाई गुजरात टायटन्समध्ये सामील
अजमतुल्ला उमरझाईला गुजरात टायटन्सने 50 लाखांच्या मूळ किमतीत खरेदी केलंय. अजमतुल्ला उमरझाई हा अफगाणिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसला आहे.
IPL 2024 Auction Live Updates : रवींद्रनंतर शार्दुल सीएसकेच्या संघात
शार्दुल ठाकूरला चेन्नई सुपर किंग्जने 4 कोटींची बोली लावत आपल्या संघात शामिल करुन घेतलं.
IPL 2024 Auction Live Updates : रवींद्र सीएसकेकडून दिसणार खेळताना
रचिन रवींद्रला चेन्नई सुपर किंग्सने 1.80 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात सहभागी करुन घेतलं आहे. रवींद्रची मूळ किंमत 50 लाख रुपये होती.
IPL 2024 Auction Live Updates : हसरंगा सनरायझर्सचा ताफ्यात
वानिंदू हसरंगा सनरायझर्स हैदराबादमधून खेळताना दिसणार आहे. त्याला मूळ किंमत दीड कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात घेतलंय.
IPL 2024 Auction Live Updates : मनीष पांडेही अनसोल्ड
स्टार फलंदाज मनीष पांडेही विकला गेला नाही. मनीष पांडेची मूळ किंमत 50 लाख रुपये होती.
IPL 2024 Auction Live Updates : करुण नायर आणि स्मिथ अनसोल्ड
तर नायरपाठोपाठ ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टीव्ह स्मिथलाही कोणी विकत घेतलं नाही. स्मिथची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती.
IPL 2024 Auction Live Updates : करुण नायर आणि स्मिथ अनसोल्ड
कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा करुण नायर पहिल्या फेरीत कोणीही विकत घेतलं नाही. नायरची मूळ किंमत 50 लाख रुपये होती.
IPL 2024 Auction Live Updates : ट्रॅव्हिस हेड 6.80 कोटींमध्ये सनरायझर्सच्या संघात
हॅरी ब्रूक आयपीएलच्या पुढील हंगामात सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना दिसणार आहे. ट्रॅव्हिस हेडला सनरायझर्सने 6.80 कोटी रुपयांना विकत घेतले. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती.
IPL 2024 Auction Live Updates : रोव्हमन पॉवेलला राजस्थान रॉयल्सने 7.40 कोटीला घेतलं संघात
IPL 2024 Auction Live Updates : रोव्हमन पॉवेलला विकत घेण्यासाठी नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात चुरशीची लढत पाहिला मिळाली. राजस्थान रॉयल्सने पैज जिंकून पॉवेलला 7.40 कोटी रुपयांला आपल्या ताफ्यात शामिल करुन घेतलं. पॉवेल आता राजस्थानकडून खेळताना दिसणार आहे.
IPL 2024 Auction Live Updates : ऑक्शनला सुरुवात, कोणावर लागणार सर्वाधिक बोली?
#IPLAuction 2024 मध्ये दुसरा खेळाडू इंग्लंडचा हॅरी ब्रूक बोली लागली. त्याची मूळ किंमत INR 2 कोटी एवढी होती. @DelhiCapitals आणि @rajasthanroyals त्याच्यासाठी रस्सीखेच केली. पण त्याला 4 कोटीला @DelhiCapitals आपल्या संघात घेतलं आहे.
IPL 2024 Auction Live Updates : ऑक्शनला सुरुवात, कोणावर लागणार सर्वाधिक बोली?
#IPLAuction 2024 मध्ये रिले रोसोला कोणीही विकत घेतलं नाही. या खेळाडूची मूळ किंमत INR 1 कोटी एवढी होती.
IPL 2024 Auction Live Updates : महेंद्र सिंह धोनी दुबईत
#IPLAuction 2024 दिल्ली कॅपिटल्सचा ऋषभ पंत आणि सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीह दुबईला लिलावासाठी उपस्थित आहेत.
IPL 2024 Auction Live Updates : ऑक्शनला सुरुवात, कोणावर लागणार सर्वाधिक बोली?
#IPLAuction 2024 मध्ये पहिला खेळाडू रोव्हमन पॉवेलवर बोली सुरु आहे. त्याची मूळ किंमत INR 1 कोटी आहे.
IPL 2024 Auction Live Updates : कोणावर लागणार सर्वाधिक बोली, थोड्याच वेळात ऑक्शनला सुरुवात
थोड्याच वेळात आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी मिनी लिलावाला सुरुवात होणार आहे. या वर्षी सर्वाधिक बोली कुठल्या खेळाडूवर लागते हे पाहणं औत्सुकाचं ठरणार आहे.
IPL 2024 Auction Live Updates : मोठी बातमी! 'या' 3 स्टार खेळाडूंनी नावं घेतली मागे
ESPNcricinfo नुसार, बांगलादेशचे स्टार वेगवान गोलंदाज तस्किन अहमद आणि शौरीफुल इस्लाम यांनीही आयपीएल लिलावातून माघार घेण्याचं कारण समोर आलं आहे. बांगलादेशला मार्च आणि एप्रिलमध्ये घरच्या मैदानावर श्रीलंका आणि झिम्बाब्वेविरुद्ध मालिका खेळायची असल्याने त्यांनी IPL मधून बाहेर पडले आहेत. तर इंग्लंडच्या टीमला 22 ते 30 मे दरम्यान घरच्या मैदानावर पाकिस्तान विरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहेत. त्यामुळे स्पिन रेहानने IPL मधून माघार घेतली आहे.
IPL 2024 Auction Live Updates : आयपीएल 2024 च्या लिलावापूर्वी मोठी अपडेट आली आहे. आयपीएलमधील तीन स्टार खेळाडूंनी लिलावातून आपलं नावं मागे घेतल्याचं वृत्त आहे. इंग्लंड संघाचा स्टार लेगस्पिन अष्टपैलू खेळाडू रेहान अहमदने, बांगलादेश संघाचा स्टार वेगवान गोलंदाज तस्किन अहमद आणि शौरीफुल इस्लाम या तिघांनी आपलं नावं मागे घेतलंय.
IPL 2024 Auction Live Updates : प्रत्येक IPL लिलावात सर्वात महागडे भारतीयांची यादी
महेंद्रसिंग धोनीला पहिल्या-वहिल्या आयपीएल लिलावात CSK ने $1.5 दशलक्षला विकत घेतलं. IPL 2008 च्या लिलावात तो सर्वात महागडा खेळाडू होता. IPL 2011 च्या लिलावात गौतम गंभीर हा सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला होता. तो KKR ला $2.4 दशलक्षमध्ये विकला गेला होता. IPL 2016 च्या लिलावात पवन नेगी हा सर्वात महागडा भारतीय होता. यंदा सर्वाधिक बोली कोणावर लागते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
IPL 2024 Auction Live Updates : प्रत्येक IPL लिलावात सर्वात महागडे भारतीयांची यादी
महेंद्रसिंग धोनीला पहिल्या-वहिल्या आयपीएल लिलावात CSK ने $1.5 दशलक्षला विकत घेतलं. IPL 2008 च्या लिलावात तो सर्वात महागडा खेळाडू होता. IPL 2011 च्या लिलावात गौतम गंभीर हा सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला होता. तो KKR ला $2.4 दशलक्षमध्ये विकला गेला होता. IPL 2016 च्या लिलावात पवन नेगी हा सर्वात महागडा भारतीय होता. यंदा सर्वाधिक बोली कोणावर लागते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
IPL 2024 Auction Live Streaming : आजच्या लिलावात ऋषभ पंत पहिल्यांदाच #DC लिलावाच्या टेबलवर दिसणार आहे. पाहा त्याची खास मुलाखत
IPL 2024 Auction Live Streaming : आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच एक महिला करणार लिलाव
आयपीएलच्या लिलावात यावेळी सर्वांचे डोळे आश्चर्यचकित होणार आहे. कारण आयपीएच्या इतिहासात इतिहासात पहिल्यांदाच एक महिला लिलाव करणार आहे. मल्लिका सागर, असं त्या महिलेच नाव आहे.
अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा - स्टार खेळांडूंचा लिलाव करणारी मल्लिका सागर आहे कोण?
IPL 2024 Auction Live Streaming : आयपीएल लिलावात 'या' खेळाडूंवर सर्वांची नजर
शार्दुल ठाकूर
शार्दुल ठाकूर डेथ ओव्हर्स स्पेशलिस्ट म्हणून भारतीय वेगवान गोलंदाजांमध्ये एक महत्त्वाचा पर्याय आहे. भारतीय वेगवान गोलंदाजाने 2023 मध्ये सर्वात उत्पादक शार्दुल ठाकूरच्या अष्टपैलू खेळामुळे त्याला आगामी लिलावात सर्वाधिक मागणी असण्याची शक्यता आहे.
डॅरिल मिशेल
राजस्थान रॉयल्सकडून खेळताना न्यूझीलंडचा फलंदाज डॅरिल मिशेलला 2022 मध्ये 75 लाख रुपयांना विकत घेतले होते. मात्र आता त्याची कामगिरी आयपीएल फ्रँचायझींच्या नजरेतून सुटणार नाही. त्यामुळे त्याच्यासाठी मोठी रक्कम खर्च करण्याचा निर्णय घेतल्यास आश्चर्य वाटणार नाही.
वानिंदू हसरंगा
जगातील सर्वोत्कृष्ट फिरकी गोलंदाजी अष्टपैलू खेळाडूंपैकी एक श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा हा आयपीएलमधील त्याच्या एकमेव पूर्ण हंगामात, सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता. त्यामुळे फिरकीपटू म्हणून त्याच्याकडे पाहिले जाऊ शकते.
हर्षल पटेल
जेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने हर्षलला त्याला पर्पल कॅप मिळाल्यानंतर आयपीएल 2022 च्या आधी 10.75 कोटी रुपयांमध्ये परत आणले, तेव्हा त्याने दमदार कामगिरी केली होती. मात्र, बरगडीच्या दुखापतीने तो भारतीय संघातून बाहेर पडला. मात्र आताच्या लिलावात त्याचे नाव आले तर आश्चर्य वाटायला नको.
मिचेल स्टार्क
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क 2015 नंतर पुन्हा आयपीएलमध्ये सहभागी होणार आहे. त्याच्या डाव्या हाताची ऑपरेशन लाइन तसेच बॅटने मारण्याची क्षमता लिलावाच्या दिवशी खूप लक्ष वेधून घेऊ शकते.
गेराल्ड कोएत्झी
गेराल्ड कोएत्झी हा दक्षिण आफ्रिकेचा नवा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत केवळ 42 टी-20 सामने खेळले आहेत. पण त्याने नुकत्याच संपलेल्या विश्वचषकात भारतीय परिस्थितीत आपली उपयुक्तता सिद्ध केली. त्याने 8 सामन्यात 20 बळी घेतले आहेत. त्यामुळे तो थोडा महागडा ठरू शकतो.
अर्शिन कुलकर्णी
अंडर-19 क्रिकेटपटू अर्शिन कुलकर्णी देखील सध्या चांगलाच फॉर्मात आहे. तो मध्यमगती गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे. 18 वर्षीय अष्टपैलू खेळाडूला क्रिकेटचा फारसा अनुभव नाही, पण त्याने महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये आपली छाप पाडली होती
ट्रॅव्हिस हेड
वर्ल्डकप 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या यशात डावखुरा फलंदाज ट्रॅव्हिस हेडचा महत्त्वाचा वाटा होता. याशिवाय हा फलंदाज एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षकही आहे आणि अनेक संघ त्याला आपल्या संघात सामील करू इच्छितात.
कार्तिक त्यागी
कार्तिक त्यागीला आयपीएल 2020 हंगामापूर्वी राजस्थान रॉयल्सने 1.3 कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्यागीला त्याच्या पहिल्या मोसमात 10 सामने खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने नऊ विकेट घेतल्या. एक आश्वासक युवा वेगवान गोलंदाज म्हणून त्याच्याकडे लिलावात लक्ष असणार आहे.
IPL 2024 Auction Live Streaming : 333 खेळाडू, 263 कोटी रुपये, कोणत्या खेळाडूंवर लागणार बोली...
इंडियन प्रीमिअर लीग 2024 साठी 333 खेळाडूंचं रजिस्ट्रेशन करण्यात आलं आहे. यापैकी 77 खेळाडूंना खरेदी केलं जाणार आहे.
अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा - IPL 2024: 333 खेळाडू, 263 कोटी रुपये, कोणत्या खेळाडूंवर लागणार बोली... तुम्हाला हवी असलेली सर्व माहिती एका क्लिकवर
IPL 2024 Auction Live Streaming : कोणाकडे किती रक्कम बाकी? (Purse Left Per Team)
चेन्नई सुपर किंग्सकडे 31.4 रुपये उपलब्ध असून 6 खेळाडूंचा स्लॉट आहे. दिल्ली कॅपिटल्सकडे 28.95 कोटी रुपये शिल्लक असून 9 खेळाडू खरेदी करु शकतात. गुजरात टायटन्सकडे 38.15 कोटी रुपये असून त्यांना 8 खेळाडू खरेदी करण्याची मुभा असणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सकडे 32.7 कोटी रुपये शिल्लक असून त्यांना 12 खेळाडू निवडता येणार आहेत. मुंबई इंडियन्सकडे 17.75 कोटी रुपये बाकी असून त्यांना 8 खेळाडू खरेदी करता येणार आहेत.
IPL 2024 Auction Live Streaming : कोणाकडे किती रक्कम बाकी? (Purse Left Per Team)
CSK - 31.4 कोटी रुपये
DC - 28.95 कोटी रुपये
GT - 38.15 कोटी रुपये
KKR - 32.7 कोटी रुपये
LSG - 13.15 कोटी रुपये
MI - 17.75 कोटी रुपये
PJKS - 29.1 कोटी रुपये
RCB - 23.25 कोटी रुपये
RR - 14.5 कोटी रुपये
SRH - 34 कोटी रुपयेIPL 2024 Auction Live Streaming : कुठे पाहाल LIVE स्ट्रिमिंग? (IPL 2024 Auction Live Streaming)
स्टार स्पोर्ट्सकडे IPL 2024 लिलावाची अधिकृत प्रसारक मान्यता असल्याना स्टार स्पोर्ट्स 2, स्टार स्पोर्ट्स 2 एचडी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी हिंदी, स्टार स्पोर्ट्स 3, स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 तमिळ, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी तमिळ, तुम्ही स्टार स्पोर्ट्स 1 तेलुगु, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी तेलुगु आणि स्टार स्पोर्ट्स 1 कन्नड यावर तुम्ही लिलाव पाहू शकणार आहात. त्याशिवाय ऑनलाईनसाठी तुम्ही जिओ सिनेमावर (JioCinema) लिलाव पाहू शकणार आहात.
IPL 2024 Auction Live Streaming : आयपीएलचा लिलाव हा दुबईच्या वेळेनुसार सकाळी 11.30 वाजता तर भारतीय वेळेनुसार हा लिलाव दुपारी 1 वाजता सुरू होणार आहे.