CSK vs SRH Live Score, IPL 2024 : सीएसकेचा मागचा हिशोब पूर्ण, हैदराबादला केलं 78 धावांनी पराभूत

Sun, 28 Apr 2024-11:33 pm,

CSK vs SRH Live Score, IPL 2024 : आज आयपीएल 2024 च्या 46 व्या सामन्यात चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्ससमोर कठिण आव्हान उपस्थित करणार आहे.

Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad Live Score in Marathi:  आजच्या चेन्नई आणि हैदराबादच्या लढतीत कोणता संघ बाजी मारणार हे बघण्यायोग्य ठरणार आहे. पॉइंट्स टेबलमध्ये चेन्नईचा संघ 8 पॉइंट्ससोबत सहाव्या स्थानावर आहे, तर हैदराबादचा संघ 10 पॉइंट्ससोबत तिसऱ्या स्थानावर आहे, अशात चेन्नई सुपर किंग्स, या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला पराभूक करून आपल्या मागील पराभवाचा बदला घेणार का, हे बघण्यायोग्य ठरणार आहे. 

Latest Updates

  • 16 व्या ओव्हरमध्ये पाथिरानाने हैदराबादचा धाकड फलंदाज क्लासेन हा 20 धावांवर आउट झाला आहे. चेन्नईने क्लासेनच्या विकेटने या सामन्यात मजबूत पकड बनवली आहे.

  • 15 ओव्हरनंतर हैदराबादचा स्कोर 109-5 असा आहे. समद हा 12 धावांवर खेळत असून, क्लासेन हा 19 धावांवर आहे. या स्थितीतून हैदराबादला जिंकण्यासाठी 30 बॉलमध्ये 104 धावांची गरज आहे.

  • 11 व्या ओव्हरमध्ये चेन्नईचा स्टार गोलंदाज मथिशा पथिरानाने, एडण मारक्रमला 32 धावांवर खेळत असताना क्लिन बोल्ड केलं आहे. पाचव्या विकेटनंतर अब्दूल समद हा फलंदाजीसाठी आला आहे.

  • रवींद्र जडेजाच्या 9 व्या ओव्हरमध्ये सेट दिसत असलेल्या नीतीश रेड्डीला 15 धावांवर आउट केलं आहे. चौथ्या विकेटनंतर फलंदाजीसाठी हेनरिच क्लासेन हा फलंदाजीसाठी आला आहे. 9 ओव्हरनंतर हैदराबादचा स्कोर 73-4 असा आहे, तर हैदराबादला जिंकायला 66 बॉलमध्ये 140 रन लागत आहेत.

  • 5 ओव्हरनंतर सनरायझर्स हैदराबादचा स्कोर 45-3 असा आहे. एडन मारक्रम हा 14 धावांवर खेळतोय, तर नीतीश रेड्डी हा 3 धावांवर खेळत आहे. या स्थितीतून हैदराबादला 30 बॉलमध्ये धावांची 168 गरज आहे.

  • चौथ्या ओव्हरमध्ये तुषार देशपांडेने तिसरी विकेट घेतली आहे. अभिषेक शर्मा हा 15 धावांवर आउट झाला आहे. तिसऱ्या विकेटनंतर नीतीश रे्ड्डी हा फलंदाजीसाठी आला आहे. 

  • तुषार देशपांडेच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये सलग दोन बॉलमध्ये दोन विकेट घेत, ट्रॅविस हेड आणि अनमोलप्रित सिंग याला बाद केलं आहे. दुसऱ्या विकेटनंतर मैदानात एडन मारक्रम हा फलंदाजीसाठी आलाय.

  • 20 ओव्हरनंतर चेन्नई सुपर किंग्सने, सनरायझर्स हैदराबादला 212 धावांचे आव्हान दिलं आहे. चेन्नईकडून फलंदाजीत ऋतुराज गायकवाडने 98 धावांची उत्कृष्ट इनिंग खेळली आहे, शिवम दुबे यानेसुद्धा नाबाद 39 धावांची इनिंग खेळलीये, तर डॅरेल मिचेलने पण 52 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिलं आहे. हैदराबादकडून गोलंदाजीत भूवनेश्वर, नटराजन आणि उनाडटने प्रत्येकी 1-1 विकेट घेतल्या आहेत.

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    तर आता बघण्यायोग्य गोष्ट असणार हैदराबादच्या दमदार फलंदाजीसमोर 213 धावांचे लक्ष पूरेसे पडणार का?

     

     

  • 15 व्या ओव्हरमध्ये चेन्नईचा सुपर किंग्सचा स्कोर 148-2 असा आहे. शिवम दुबे हा 2 धावांवर खेळतोय, गायकवाड हा 80 धावांवर खेळत आहे. 

  • 14 व्या ओव्हरमध्ये जयदेव उनाडटने डॅरेल मिचेलला 52 धावांवर आउट केलं आहे. दुसऱ्या विकेटनंतर मैदानावर फलंदाजीसाठी सिएसकेचा घातक फलंदाज शिवम दुबे हा आलाय.

  • 13 व्या ओव्हरमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या डॅरेल मिचेलने 30 बॉलमध्ये 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे.

  • सीएसकेचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड याने 27 बॉलमध्ये 7 चौकार आणि 1 षटकारांच्या मदतीने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. गायकवाड आणि मिचेल यांच्यात 63 भागीदारी पूर्ण झाली असून, 9 ओव्हरच्या समाप्तीनंतर चेन्नईचा स्कोर 82-1 असा आहे.

  • 5 ओव्हरनंतर चेन्नई सुपर किंग्सचा 45-1 स्कोर असा आहे. गायकवाड हा 28 धावांवर खेळत असून, डेरेल मिचेल हा 6 धावांवर त्याचे साथ देत आहे.

  • तिसऱ्या ओव्हरमध्ये भूवनेश्वर कुमारने चेन्नईचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे हा 9 धावा करून तंबूत परतला आहे. पहिल्या विकेटनंतर डॅरेल मिचेल हा फलंदाजीसाठी आला आहे.

  • CSK vs SRH टॉस अपडेट - सनरायझर्स हैदराबादचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    CSK प्लेइंग 11 -

    अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड(C), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (W), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना

     

    SRH प्लेइंग 11 -

    अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (W), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (C), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन

     

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link