India vs Sri Lanka T20 Live Score: श्रीलंकेचे 5 खेळाडू पव्हेलियनमध्ये, टीम इंडिया जिंकण्याच्या मार्गावर

Sat, 27 Jul 2024-10:26 pm,

India vs Sri Lanka T20 Live Score: भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 सिरीजला आजपासून सुरुवात होत आहे. पालेकेला स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.

India vs Sri Lanka T20 Live Score: चरिथ असलंकाच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेचा सामना जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाच्या टीमशी असला तरीही लंका विजयाने सुरुवात करण्याचा विचार करत असणार. सूर्यकुमार यादवही नियमित कर्णधार म्हणून पहिली मालिका खेळणार आहे. त्याचीही नजर विजयावर असेल.

Latest Updates

  • India vs Sri Lanka T20 Live Score: अक्षर पटेलचा डबल धमाका; 15 ओव्हरमध्ये घेतल्या 2 विकेट्स

    15 व्या ओव्हरमध्ये श्रीलंकेला दोन धक्के बसले. अक्षर पटेलने पहिल्याच चेंडूवर चांगली फलंदाजी करणाऱ्या पथुम निसांकाला क्लीन बोल्ड केले. निसांकाने 48 चेंडूंत सात चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 79 धावांची खेळी खेळली. यानंतर शेवटच्या चेंडूवर कुसल परेराला रवी बिश्नोईकरवी झेलबाद केले. परेराने 14 चेंडूत 20 धावा केल्या. 

  • India vs Sri Lanka T20 Live Score: पथुम निसांकाने 33 बॉल्समध्ये अर्धशतक झळकावलं आहे. त्याचे T20I कारकिर्दीतील हे 11वे अर्धशतक आहे. त्याने भारताविरुद्ध तिसरे अर्धशतक झळकावले आहे.

  • India vs Sri Lanka T20 Live Score: अर्शदीप सिंगकडून श्रीलंकेला पहिला धक्का

    अर्शदीप सिंगने भारताला पहिलं यश मिळवून दिलं. अर्शदीपने नवव्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर कुश मेंडिसला यशस्ववीकडे कॅच आऊट केले. मेंडिसने 27 चेंडूत 45 धावांची खेळी खेळली, ज्यात सात चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्याने निसांकासोबत 84 धावांची भागीदारी केली.

  • India vs Sri Lanka T20 Live Score: टीम इंडियाकडून श्रीलंकेला 214 रन्सचं आव्हान

    भारताने श्रीलंकेसमोर 214 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 ओव्हर्समध्ये 7 गडी गमावून 213 रन्स केले. कर्णधार सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 58 धावा केल्या. तर ऋषभ पंतने 49 आणि यशस्वी जयस्वालने 40 धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून मथिशा पाथिरानाने चार विकेट घेतल्या.

  • India vs Sri Lanka T20 Live Score: ऋषभ पंतचे अर्धशतक हुकले

    पाथीरानाने 19व्या षटकात भारताला दुहेरी धक्का दिला. त्याने पहिल्याच चेंडूवर रियाग परागला एलबीडब्ल्यू केलं. परागने 6 चेंडूत केवळ 7 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून एक चौकार आला. तर पाचव्या बॉलवर पाथीरानाने ऋषभ पंतला बोल्ड केलं. त्याने 33 चेंडूत 49 धावांची खेळी खेळली, ज्यात 6 चौकार आणि 1 षटकार होता.

  • India vs Sri Lanka T20 Live Score: टीम इंडियाला चौथा धक्का; हार्दिक बाद

    हार्दिक पंड्याची बॅट आज चांगली कामगिरी करू शकली नाही. त्याने 10 चेंडूत एका चौकारासह केवळ 9 धावा केल्या. 17व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर पांड्याला पाथीरानाने बोल्ड बाद केलं. 

  • India vs Sri Lanka T20 Live Score: टीम इंडियाला दुसरा धक्का; जयस्वाल पव्हेलियनमध्ये परत

    भारताची दुसरी विकेट यशस्वी जस्वालच्या रूपाने पडली. यशस्वी जयस्वालचं अर्धशतक हुकलं. त्याने 21 चेंडूंत 40 धावांची खेळी खेळली, ज्यात पाच चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. सातव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याला वानिंदू हसरंगाने बाद केले.

  • India vs Sri Lanka T20 Live Score: टीम इंडियाच्या फलंदाजीला सुरुवात, जयस्वाल-गिलची तुफान फलंदाजी

    भारतीय डावाची सुरुवात झाली आहे. शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल फलंदाजीसाठी मैदानात उतरले आहेत. दिलशान मदुशंकाने पहिल्या षटकात 13 रन्स दिले. यशस्वीने डावाच्या पहिल्या चेंडूवर चौकार तर दुसऱ्या चेंडूवर एकच फटका मारला. गिलने पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर चौकार मारले.

  • India vs Sri Lanka T20 Live Score: श्रीलंकेने जिंकला टॉस, टीम इंडिया पहिल्यांदा करणार फलंदाजी

    भारताविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकला आहे. भारत प्रथम फलंदाजीसाठी उतरणार आहे

  • India vs Sri Lanka T20 Live Score: भारत-श्रीलंका T20 हेड-टू-हेड

    भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत 29 T20 सामने खेळले गेले आहेत. या काळात भारताचा वरचष्मा राहिला आहे. भारताने 19 सामने जिंकले, तर श्रीलंकेने 9 सामने जिंकले. एक सामना अनिर्णित राहिला.

  • India vs Sri Lanka T20 Live Score: गंभीरची पहिली परिक्षा

    टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची पहिली परिक्षा आहे. श्रीलंकेचा दौऱा 27 जुलैपासून सुरू होत आहे. टीम इंडिया आज श्रीलंकेविरुद्ध पहिला T20 सामना खेळणार आहे.

  • India vs Sri Lanka T20 Live Score: श्रीलंकेची संभाव्य प्लेईंग 11

    अविष्का फर्नांडो, चारिथ असलंका (कर्णधार), पाथुम निसांका, कुसल मेंडिस, दिनेश चंडिमल, वानिंदू हसरंगा, दासुन शनाका, मथिशा पाथिराना, महेश थेक्षाना, दुनिथ वेलेझ, बिनुरा फर्नांडो.

  • India vs Sri Lanka T20 Live Score: भारताची संभाव्य प्लेईंग 11

    यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link