IND vs USA Live Score: टीम इंडियाकडून युएसएचा 7 विकेट्सने पराभव
IND vs USA Score Live: टी-20 वर्ल्डकपला सुरुवात झाली असून आज भारत विरूद्ध अमेरिका आमने सामने येणार आहेत. दोन्ही संघांनी 2-2 सामने खेळले असून सर्व सामने जिंकण्यात या टीम्सना यश आलं आहे.
IND vs USA Score Live: टी-20 वर्ल्डकपला सुरुवात झाली असून आज भारत विरूद्ध अमेरिका आमने सामने येणार आहेत. दोन्ही संघांनी 2-2 सामने खेळले असून सर्व सामने जिंकण्यात या टीम्सना यश आलं आहे.
Latest Updates
टीम इंडियाने यजमान युएसएचा 7 गडी राखून पराभव केलाय. युएसएने प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियासमोर 110 धावा उभ्या केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना टीम इंडियाने 10 बॉल राखून 111 धावांचं आव्हान पूर्ण केलं.
युएसएने टीम इंडियावर गोलंदाजीचा घातक मारा केलाय. टीम इंडियाचा स्टार फलंदाज ऋषभ पंत क्लिन बोल्ड झाला. अली खानने त्याची विकेट घेतली.
विराट पाठोपाठ कॅप्टन रोहित शर्मा देखील बाद झाला. रोहित शर्मा देखील नेत्रावळकरच्या इन लाईन बॉलचा शिकार झाला.
विराट कोहली सौरभ नेत्रावळकरचा शिकार झालाय. त्याला केवळ 1 धाव करता आलीये.
टीम इंडियाला पहिला धक्का, नेत्रावळकरने घेतली विराटची विकेट
प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेने भारतासमोर विजयासाठी 111 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने 4 विकेट्स घेतल्या अन् युएसएची दैना उडवली. अमेरिकेच्या संघाला 20 षटकांत आठ गडी बाद 110 धावाच करता आल्या.
युएसएचा अर्धा संघ तंबूत परतलाय. युएसएने 15 ओव्हरमध्ये 81 धावा केल्या आहेत.
युएसएचा स्टार फलंदाज नितीश कुमार याची विकेट अर्शदीपने घेतली. मोहम्मद सिराजने बॉन्ड्रीवर अफलातून कॅच घेतला.
IND vs USA Score Live: 10 ओव्हर्सनंतर अमेरिकेची स्थिती 42 धावांवर 3 विकेट्स
पहिल्या 3 विकेट्स झटपट गेल्यानंतर अमेरिकेच्या फलंदाजांनी कासवगतीने धावा करत डाव सावरला आहे. यादरम्यान काही मोठे फटकेही लगावण्यात आले आहेत. 10 ओव्हर्सनंतर संघाची स्थिती 42 धावांवर 3 गडी बाद अशी आहे.
IND vs USA Score Live: हार्दिक पांड्याला मिळाली पहिली विकेट
अमेरिकेला तिसरा झटका, ऐरन जॉस 11 धावांवर बाद; 25 वर 3 गडी बाद अशी स्थिती
IND vs USA Score Live: दोन विकेट गमाल्यानंतर अमेरिकेने डाव सावरला; 5 ओव्हर्सनंतर 17 धावांवर 2 बाद स्थिती
IND vs USA Score Live: अर्शदीपने पहिल्याच ओव्हरमध्ये काढल्या 2 विकेट्स, गॉस 2 धावांवर माघारी
IND vs USA Score Live: भारताची दमदार सुरुवात
अर्शदीपने पहिल्याच चेंडूवर काढली विकेट, शयन जहांगीर एकही धाव न करता माघारी
युएसए (प्लेइंग इलेव्हन): स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर, अँड्रिज गॉस (WK), आरोन जोन्स (C), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, सौरभ नेत्रावलकर, अली खान.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), विराट कोहली, ऋषभ पंत (WK), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.
रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने संघामध्ये कोणताही बदल केला नाही. पाकिस्तानविरुद्ध जो संघ होता, तोच संघ मैदानात उतरेल.
IND vs USA Score Live: टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
भारतीय संघ : रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
IND vs USA Score Live: कसा आहे पीचचा इतिहास?
जर आपण न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमच्या खेळपट्टीचा इतिहास पाहिला तर या ठिकाणीा आतापर्यंत 7 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीमने 3 वेळा सामना जिंकला आहे आणि 4 वेळा लक्ष्याचा पाठलाग करताना जिंकणं शक्य झालं आहे.
IND vs USA Score Live: विराटची बॅट आज चालणार का?
आयपीएल 2024 मध्ये विराट कोहलीने उत्तम खेळ केला होता. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो खेळाडू होता. मात्र, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मागील तीन सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधून केवळ 4 रन्स निघालेत. जानेवारीत अफगाणिस्तानविरुद्ध तो शून्यावर बाद झाला होता आणि टी-20 विश्वचषकाच्या दोन सामन्यांत तो चार धावा करू शकला आहे.
IND vs USA Score Live: शिवम दुबेसाठी महत्त्वाचा सामना
टीम इंडियाचा ऑलराऊंडर शिवम दुबेसाठी हा सामना सर्वात महत्त्वाचा आहे. कारण गेल्या दोन सामन्यांमध्ये तो धावा करू शकला नाही आणि सराव सामन्यातही तो अपयशी ठरला. आयपीएल 2024 च्या शेवटच्या सामन्यांमध्येही त्याची कामगिरी चांगली नव्हती. अशा स्थितीत तो प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
IND vs USA Score Live: सौरभ नेत्रावळकरसाठी सोपा नसणार हा सामना
सौरभ नेत्रावळकर आज भारतीय टीमसमोर खेळताना दिसणार आहे. त्याला या सामन्यात प्रवेश करणं सोपं जाणार नाही. याचं कारण म्हणजे त्याने भारताकडून अंडर 19 क्रिकेट खेळलं आहे. टीम इंडियातील सध्याच्या अनेक खेळाडूंसोबत तो देशांतर्गत क्रिकेटही खेळला आहे.
IND vs USA Score Live: न्यूयॉर्कमधील शेवटचा सामना
T20 वर्ल्डकप 2024 चा शेवटचा सामना आज न्यूयॉर्कमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना यजमान अमेरिका आणि भारत यांच्यात होणार आहे. या ठिकणी खेळल्या गेलेल्या प्रत्येक सामन्यात स्कोर कमी झाला आहे.
IND vs USA Score Live: कसा आहे भारताचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, संजू सॅमसन, कुलदीप यादव, यशस्वी जैस्वाल.
IND vs USA Score Live: खेळपट्टी आणि हवामान कसं असेल?
न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांपेक्षा गोलंदाजांसाठी योग्य मानली जाते. खेळपट्टीप्रमाणेच येथील हवामानही सर्वांना आश्चर्यचकित करणारे आहे. भारत-पाकिस्तान सामन्यातही पावसाने हजेरी लावली असून आजच्या सामन्यात पावसामुळे सामना बिघडू शकतो.
IND vs USA Score Live: भारताला या खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा
रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत यांच्याकडून भारताला चांगल्या फलंदाजीची अपेक्षा असेल, तर गोलंदाजीत भारताला काळजी करण्याची गरज नाही. बुमराह, सिराज, अर्शदीप सिंग आणि पटेल यांच्याकडून पुन्हा एकदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
IND vs USA Score Live: ॉभारताने पाकिस्तानविरुद्धचा शेवटचा सामना ज्याप्रकारे जिंकला, त्यावरून टीम इंडियाचं मनोबल खूप उंचावलंय. अमेरिकेनेही पाकिस्तानला पराभूत केलं होतं आणि भारताप्रमाणेच अमेरिकेने दोनपैकी दोन सामने जिंकले आहेत.
IND vs USA Score Live: 8 वाजता भिडणार भारत-अमेरिका
बुधवारी भारत आणि अमेरिका यांच्यात सामना होणार आहे. T20 विश्वचषक (T20 World Cup 2024) चा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल.