India vs Canada Live Score : कॅनडाविरुद्धच्या सामन्यात पावसाचा खोडा, सामना रद्द...! आता थेट सुपर 8

Saurabh Talekar Sat, 15 Jun 2024-11:36 pm,

India vs Canada Live Score, T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकाच्या 33 व्या सामन्यात भारत आणि कॅनडा आमने सामने येणार आहेत. पण सामन्यात पाऊस खोडा घालणार का? असा सवाल विचारला जातोय.

India vs Canada Live Score: टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील साखळी फेरीतील अखेरचा सामना आज टीम इंडिया खेळणार आहे. फ्लोरिडाच्या लॉडरहिल येथील स्टेडियमवर टीम इंडिया आणि कॅनडा या दोन्ही संघात जबरदस्त फाईट होईल. पण सामन्यावर पावसाचं सावट असल्याने फॅन्सच्या चिंता वाढल्या आहेत.

Latest Updates

  • फ्लोरिडामध्ये होणारा भारत आणि अमेरिका यांच्यातील सामना एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला आहे. या सामन्यात नाणेफेकही होऊ शकली नाही आणि पंचांनी दोनदा मैदानाची पाहणी केल्यानंतर सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता दोन्ही संघाला 1-1 गुण मिळाला आहे.

  • फ्लोरिडा येथील सेंट्रल ब्रोवार्ड रीजनल पार्क स्टेडियममध्ये ओल्या खेळपट्टीमुळे टॉसला उशीर झाला. रात्री ९ वाजता पंच पुढील तपासणी करतील. 

  • पाऊस खोडा घालणार?

    कॅनडा विरुद्ध भारत सामन्यादरम्यान पावसाची 35 ते 45 टक्के आणि वादळाची 50 टक्के शक्यता आहे. गेल्या दोन दिवसापासून फ्लोरिडामध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाने कहर केलाय. त्यामुळे आजच्या सामन्यावर सर्वांचं लक्ष आहे. 

  • कॅनडाविरुद्ध टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link