IND vs PAK LIVE Score: भारताने पाकिस्तानचा उडवला धुव्वा, 228 धावांनी मिळवला विजय

Mon, 11 Sep 2023-11:05 pm,

India vs Pakistan Live Score Asia Cup 2023: भारत विरूद्ध पाकिस्तान ( India vs Pakistan ) सामना राखीव दिवशी खेळवला जाणार आहे.

India vs Pakistan Live Score Updates: 10 सप्टेंबर रोजी कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर भारत विरूद्ध पाकिस्तान ( India vs Pakistan ) सामना रंगला होता. मात्र यावेळी पावसाने खोडा घातला. पाऊस इतका होता की, पुढे सामना खेळवता आला नाही. अखेर हा सामना आज खेळवला जाणार आहे. 

Latest Updates

  • India vs Pakistan Live Update 
    एशिया कप स्पर्धेच्या सुपर फोर सामन्यात भारतीय फलंदाजांनंतर गोलंदाजांनीह कमाल केली. भारताने पाकिस्तानचा तब्बल 228 धावांनी विजय मिळवलाय. क्रिकेटच्या इतिहासात भारताने पाकिस्तानवर मिळवलेला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. याआधी पहिली फलंदाजी करताना भारताने 356 धावांचा डोंगर रचला. विराट कोहली आणि केएल राहुलने दमदार शतक ठोकलं. यावर भारतीय गोलंदाजांनी कळस चढवला. पाकिस्तानला अवघ्या 128 धावा करता आल्या. पाकिस्तानने 8 विकेट गमावत 128 धावा केल्या. पाकिस्तानचे शेवटचे नसीम शाहा आणि हॅरीस रौफ फलंदाजीसाठीच उतरले नाहीत. भारतातर्फे चायनामन कुलदीप यादवने तब्बल पाच विकेट घेतल्या. तर बुमराह, हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी एक विकेट घेतली.

  • India vs Pakistan Live Update 

    एशिया कप स्पर्धेच्या सुपर फोर सामन्यात भारतीय फलंदाजांनंतर गोलंदाजांनीह कमाल केली आहे. अवघ्या 96 धावात पाकिस्तानचा निम्मा संघ तंबूत परतलाय. कुलदीप यादवने 2 तर बुमराह, हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी एक विकेट घेतलीय.

  • India vs Pakistan Live Update 
    एशिया कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामन्यात पुन्हा एकदा पावसाचा व्यत्यय आला आहे. पाकिस्तानने 2 विकेट गमावत 44 धाव केल्यात. इमाम-उल-हक 9 तर कर्णधार बाबर आझम 10 धावांवर बाद झाला. हार्दिक पांड्याने बाबरला क्लिन बोल्ड केलं.

  • भारताने दिलेल्या 357 धावांचं आव्हान पार करताना पाकिस्तानला दुसरा झटका बसला आहे. पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम 10 धावा करत तंबुत परतला आहे.

    PAK 43/2 (10.4)

  • India vs Pakistan Live Update 
    टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहने भारताला पहिला यश मिळवून दिलं आहे. सामन्याच्या पाचव्या षटकात बुमरहाने पाकिस्तानचा सलामीचा फलंदाज इमाम-उल-हकला पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. बुमराहच्या गोलंदाजीवर शुभमन गिलने त्याचा झेल पकडला. इमाम 9 धावा करुन बाद झाला

  • विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट 77 वी सेंच्युरी पूर्ण केली आहे. त्याचबरोबर विराट कोहलीने 13000 धावांचा टप्पा देखील गाठला आहे.

  • KL Rahul Century : कमबॅक सामन्यात केएल राहुलचं वादळी शतक ठोकलंय. केएल राहुलने 100 चेंडूत पाकिस्तानला घाम फोडला. 10 फोर आणि 2 सिक्स मारत त्याने शतक पूर्ण केलं.

  • केएल राहुलने पाकिस्तानच्या गोलंदाजांना दिवसाढवळ्या चांदण्या दाखवल्या आहेत. केएल राहुल आणि विराट कोहलीने विकेट न गमावून देता सामना खेचला आहे. 45 ओव्हरमध्ये 300 चा आकडा पार केला आहे.

  • पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीने 55 बॉलमध्ये 50 धावांची खेळी केलीये. यात त्याने 4 चौकार खेचले आहेत.

  • KL Rahul Fifty : कमबॅकनंतर केएल राहुलने दमदार अर्धशतक ठोकलंय. केएल राहुलने 60 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलंय.

     

  • के एल राहुल आणि किंग कोहलीची 50 धावांची पार्टनरशिप. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीपासूनच भारताचा फॉर्म कायम. 

  • के एल राहुल आणि किंग कोहलीची 50 धावांची पार्टनरशिप 

  • पावसाच्या प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर आता सामन्याला सुरूवात झाली आहे. केएल राहुल अन् विराट कोहली मैदानात परतले आहेत.

  • भारत आणि पाकिस्तान सामना पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. खेळपट्टीचं परीक्षण करण्यात येत आहे. त्यानंतर सामना किती वाजता सुरू होईल? याचं उत्तर मिळेल.

  • भारत पाकिस्तान सामन्यात तिकीटांबाबत एशियन क्रिकेट काऊंसिलने मोठा निर्णय घेतला आहे. काय आहे तो निर्णय पाहुया-

    IND vs PAK सामना पाहण्यासाठी तिकीटाची गरज नाही? पाहा काय आहे ACC चा निर्णय

  • पावसामुळे भारत-पाकिस्तान सामना 11 सप्टेंबर रोजी उर्वरित खेळवण्यात येणार आहे. मात्र यावेळी एक विचित्र योगायोग बनताना दिसतोय. काय आहे हा नेमका योगायोग जाणून घेऊया. पाहा लिंक- 

    Asia Cup 2023 : टीम इंडियासोबत 1524 दिवसांनी बनतोय विचित्र योगायोग; आकडे वाचून डोकं गरगरेल

     

  • कोलंबोमध्ये अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. चाहत्यांसाठी ही वाईट बातमी आहे. आजही भारत-पाकिस्तान यांच्यातील खेळावर संकट ओढवले आहे. सामना झाला नाही तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. राखीव दिवस ठेऊन काही फायदा होणार नाही.

  • पावसाच्या व्यत्ययाने 11 सप्टेंबर रोजी उर्वरित सामना खेळवण्यात येणार आहे. मात्र यावेळी एक विचित्र योगायोग बनताना दिसतोय. काय आहे हा नेमका योगायोग जाणून घेऊया.

  • सलग 3 दिवस खेळणार टीम इंडिया

    सोमवारी पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळल्यानंतर भारतीय संघाला मंगळवारी, १२ सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्धही सामना खेळायचा आहे. हा सामनाही ५०-५० ओव्हर्सचा असेल. अशा स्थितीत टीम इंडिया सलग तीन दिवस अॅक्शनमध्ये दिसणार आहे, जी वर्ल्ड कपपूर्वी भारतीय खेळाडूंसाठी अडचणीची ठरू शकते.

  • 10 सप्टेंबर रोजी भारत विरूद्ध पाकिस्तान ( India vs Pakistan ) यांच्यातील सामना सुरु झाला खरा, मात्र पावसाच्या व्यत्ययाने सामना रिझर्व्ह डे च्या दिवशी म्हणजेच आज पूर्ण करण्यात येणार आहे. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link