IND vs PAK सामना पाहण्यासाठी तिकीटाची गरज नाही? पाहा काय आहे ACC चा निर्णय

IND vs PAK: मुख्य म्हणजे पावसानं सामन्यात व्यत्यय आणला असला तरीही हिरमोड झालेल्या क्रिकेटप्रेमींना एका निर्णयानं आनंद दिला हे इथं म्हणावं लागेल.   

Sep 11, 2023, 14:35 PM IST

IND vs PAK: भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना पावसामुळं वेगळ्या वळणावर आला आणि आता एसीसी अर्थात एशियन क्रिकेट काऊन्सिलनं घेतलेल्या निर्णयामुळं या सामन्यानं सर्वांच्या नजरा वळवल्या. 

 

1/8

IND vs PAK

India vs Pakistan Asia Cup 2023 Reserve Day Tickets

IND vs PAK सामना पाहण्यासाठी तिकीटाची गरज नाही? पाहा काय आहे ACC चा निर्णय   

2/8

आशिया चषक

India vs Pakistan Asia Cup 2023 Reserve Day Tickets

11 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये आशिया चषकातील (Asia Cup-2023) सुपर 4 राऊंडचा सामना पार पडणार आहे. रिझर्व्ह डे ला पार पडणाऱ्या या सामन्याआधीच एसीसीनं एक मोठी घोषणा केली.   

3/8

मोठी घोषणा

India vs Pakistan Asia Cup 2023 Reserve Day Tickets

एशियन क्रिकेट काऊन्सिलनं केलेली ही मोठी घोषणा क्रिकेटप्रेमींना आनंद देऊन गेली. एसीसीनं अधिकृत घोषणा करत म्हटलं, 'जिथं सामना थांबला होता तिथूनच तो पुन्हा सुरु होणार आहे.'  

4/8

तिकीटं सांभाळून

India vs Pakistan Asia Cup 2023 Reserve Day Tickets

सामना पाहण्यासाठी मैदानात आलेल्या क्रिकेटप्रेमींना उद्देशून सांगताना तुमच्याकडे असणारी तिकीटं सांभाळून ठेवा आणि इतिहासाचे साक्षीदार व्हा, अशा आश्वासक शब्दांत एसीसीनं क्रिकेट रसिकांना उद्देशून एक मेसेज दिला.   

5/8

नव्यानं तिकीट खरेदी करण्याची गरज नाही

India vs Pakistan Asia Cup 2023 Reserve Day Tickets

थोडक्यात आता सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींना नव्यानं तिकीट खरेदी करण्याची गरज नाही. त्यामुळं जुन्याच तिकीटावर हा सामना पाहता येणार आहे.   

6/8

मागे वळून पाहायचं झाल्यास ...

India vs Pakistan Asia Cup 2023 Reserve Day Tickets

सामन्यात मागे वळून पाहायचं झाल्यास रविवारी पावसानं सामना जिथं थांबवला होता तिथूनच तो पुन्हा सुरु होईल. रविवारी भारतीय संघानं नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.   

7/8

प्रथम फलंदाजी

India vs Pakistan Asia Cup 2023 Reserve Day Tickets

प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं 24.1 षटकांमध्ये 2 गडी गमावत 147 धावा केल्या होत्या. रिझर्व्ह डेलासुद्धा हीच धावसंख्या संघ पुढे नेताना दिसेल. ज्यासाठी विराट कोहली आणि के.एल.राहुल मैदानावर येणार आहेत.   

8/8

सामन्यावर कोणाची कृपा

India vs Pakistan Asia Cup 2023 Reserve Day Tickets

तेव्हा आता रिझर्व्ह डे ला पाऊस सामन्यावर कृपा करतो का हे पाहण्यासोबतच कोणता संघ सामन्यात बाजी मारेल हे पाहणं अतिशय मत्त्वाचं ठरणार आहे.