LSG vs MI highlights, IPL 2024 : लखनऊकडून मुंबईचा `अदबसे` पराभव, पलटणवर 4 विकेट्सने विजय

Wed, 01 May 2024-12:02 am,

LSG vs MI Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 48 व्या सामन्यात आज लखनऊ सुपर जाएंट्सचा सामना लखनऊचे होमग्राउंड असलेल्या अटल बिहारी वाजपेयी एकाणा क्रिकेट स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्ससोबत (Lucknow Super Giants vs Mumbai Indians) होणार आहे.

Lucknow Super Giants vs Mumbai Indians Live Score in Marathi: आयपीएल 2024 मध्ये लखनऊ सुपर जाएंट्सचा संघ चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. आतापर्यंत लखनऊने 9 पैकी 5 सामने जिंकत 10 पॉइंट्ससोबत,पॉइंट्स टेबलच्या पाचव्या क्रमांकावर आहे. तर याउलट मुंबई इंडियन्सचा संघ या आयपीएलमध्ये आतापर्यंत आपली लय मिळाललेली नाहीये. मुंबईचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये 9 पैकी फक्त 6 पॉइंट्ससोबत 9 व्या स्थानावर आहे. तर बघण्यायोग्य असणार की कोणता संघ आपले तगडे प्रदर्शन दाखवत आज वरचढ ठरणार.

Latest Updates

  • लखनऊ सुपर जाएंट्सने, आपल्या होमग्राउंडवर मुंबई इंडियन्सला 4 विकेट्सने पराभूत केलं आहे. यासोबतचं महत्वाचे 2 पॉइंट्स मिळवुन लखनऊ पॉइंट्स टेबलमध्ये चेन्नईला मागे टाकत तिसऱ्या क्रमांकावर आली आहे. मुंबई इंडियन्सला आता प्लेऑफसाठी क्वॉलिफाय करणं आणखी कठिण झालं आहे.

  • 18 व्या ओव्हरमध्ये कोएट्झने टर्नरला 5 धावांवर आउट केलं आहे. पाचव्या विकेटनंतर आयुष बदोनी हा फलंदाजीसाठी आला आहे.

  • मोहम्मद नबीच्या 15 व्या ओव्हरमध्ये लखनऊचा धाकड फलंदाज मार्कस स्टॉयनिस हा 62 धावांवर आउट झाला आहे. लखनऊकडून आता फलंदाजीसाठी मैदानात निकोलस पूरन आणि टर्नर खेळत आहेत आणि लखनऊचा स्कोर आहे 116-4.

  • हार्दिक पांड्याच्या 13 व्या ओव्हरमध्ये दिपक हूड्डा हा 18 धावांवर आउट झाला आहे, तर मार्कस स्टॉयनिसने 39 बॉलमध्ये, 6 चौकार आणि1 षटाकराच्या मदतीने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे.

  • 10 ओव्हरच्या समाप्तीनंतर लखनऊ सुपर जाएंट्सचा स्कोर आहे 79-2.  मार्कस स्टॉयनिस 39 धावांवर खेळत असून त्याने लखनऊच्या फलंदाजीची एक बाजू सांभाळून ठेवली आहे, तर दिपक हूडा पण 10 धावांवर खेळत आहे. लखऊला जिंकण्यासाठी 60 बॉलमध्ये 66 धावांची गरज आहे. 

  • हार्दिक पांड्याच्या 8 व्या ओव्हरमध्ये लखनऊचा कॅप्टन के एल राहूल हा 28 धावांवर आउट झाला आहे. दुसऱ्या विकेटनंतर मैदानावर फलंदाजीसाठी दिपक हूड्डा हा आलाय.

  • 5 ओव्हरनंतर लखनऊचा स्कोर 46-1 असा आहे. के एल राहूल हा 25 धावांवर खेळतोय, तर स्टॉयनिस हा 19 धावांवर खेळत आहेत. या दोघांमध्ये एक चांगली भागीदारी होत आहे व मुंबईच्या गोलंदाजांना आता ही भागीदारी तोडणं गरजेचं झालं आहे.

  • पहिल्याच ओव्हरमध्ये लखनऊ सुपर जाएंंट्सला पहिला धक्का बसला आहे. अर्शिन कुलकर्णी हा आपल्या आयपीएल करिअरच्या पहिल्याच बॉलवर आऊट झाला आहे. पहिल्या विकेटनंतर मार्कस स्टॉयनिस हा फलंदाजी करण्यासाठी आलाय.

  • 20 ओव्हरच्या समाप्तीनंतर मुंबई इंडियन्सने, लखनऊ सुपर जाएंट्सला 145 धावांचे लक्ष दिले आहे. मुंबईकडून फलंदाजीमध्ये निराशाजनक प्रदर्शन झाले आहे. नेहाल वढेरा याने 46 धावांचे चांगले योगदान दिले आहे, तर इशान किशन याने पण 32 धावांची खेळी खेळलीये आणि टीम डेविडने शेवटच्या ओव्हरमध्ये फटकेबाजी करून 35 धावांची ताबडतोब खेळी खेळलेली आहे. लखनऊकडून गोलंदाजीत उत्कृष्ट प्रदर्शन झाले आहे. मोहसिन खानने 2 विकेट घेतल्याये, तर स्टॉयनिस, नवीन उल हक, मयंक यादव आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतल्या आहेत.

    आता बघण्यायोग्य गोष्ट असणार मुंबई इंडियन्स या 145 धावांच्या आव्हानाला, लखनऊच्या घातक फलंदाजीपासून वाचवू शकतात की नाही? 

  • 18 व्या ओव्हरमध्ये मोहसिन खान याने या मॅचची दुसरी विकेट घेतली आहे. नेहाल वढेरा हा 46 धावांवर आउट झाला आहे. सहाव्या विकेटनंतर मोहम्मद नबी हा फलंदाजीसाठी आला आहे.

  • 15 ओव्हरनंतर मुंबई इंडियन्सचा स्कोर 96-5 असा आहे. नेहाल वढेरा हा 37 धावांवर खेळतोय, तर टीम डेविड हा आताच फलंदाजी करण्यासाठी आला असल्यामुळे तो शुन्यावर आहे.

  • रवि बिश्नोईने 14 व्या ओव्हरमध्ये सेट दिसत असलेला मुंबईचा फलंदाज इशान किशनला 32 धावांवर तंबूत परत पाठवलं आहे. पाचव्या विकेटनंतर फलंदाजी करण्यासाठी टिम डेविड हा मैदानावर आला आहे.

  • 10 ओव्हरनंतर मुंबई इंडियन्सचा स्कोर 57-4 असा आहे. इशान किशन हा 21 धावावर खेळत असून त्याने मुंबईच्या फलंदाजीची एक बाजू सांभाळूण ठेवली आहे, तर त्याचे साथ नेहाल वढेरा हा 9 धावावंर देत आहे.

  • सहाव्या ओव्हरमध्ये तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या हे दोघं फलंदाज आउट झाले आहेत. तिलक हा 7 धावांवर रनआउट, तर पांड्या हा पहिल्याच बॉलवर बाद झाला आहे. मुंबईचा स्कोर आता 27-4 असा आहे.

  • मार्कस स्टॉयनिसने तिसऱ्याच ओव्हरमध्ये मुंबईला दुसरा मोठा धक्का दिला आहे. सुर्यकुमार यादव हा तिसऱ्या ओव्हरमध्ये एक षटकार मारून आउट झाला आणि दुसऱ्या विकेटनंतर फलंदाजीसाठी आता तिलक वर्मा आला आहे.

  •  मोहसिन खानच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सचा घातक फलंदाज रोहित शर्मा हा फक्त 4 धावांवर आउट झाला आहे. पहिल्या विकेटनंतर सुर्यकुमार यादव हा फलंदाजीसाठी आला आहे.

  • LSG vs MI Toss Update : लखनऊचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    LSG प्लेइंग 11 -

    केएल राहुल (C/W), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, ॲश्टन टर्नर, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान, मयंक यादव

    MI प्लेइंग 11 - 

    इशान किशन (W), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (C), नेहल वढेरा, टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह

  • LSG vs MI संभाव्य 11 -

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    LSG संभाव्य 11 -

    क्विंटन डी कॉक, के एल राहुल (C/W), मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, ॲश्टन टर्नर, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, मयंक यादव, रवी बिश्नोई, मोहसिन खान

    MI संभाव्य 11 -

    इशान किशन (W), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (C), नेहल वढेरा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, पियुष चावला, ल्यूक वुड, जसप्रीत बुमराह

     

  • LSG vs MI head to head -

    आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत लखनऊ सुपर जाएंट्स आणि मुंबई इंडियन्स हे दोघं संघ एकूण 4 वेळेस आमनेसामने आले आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने वर्चस्व निर्माण केलं आहे आणि तीन सामने जिंकले आहेत, तर लखनऊचा संघ फक्त एक सामना जिंकण्यात यशस्वी झालाय.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link