MI vs RCB highlights, IPL 2024 : मुंबईने वानखेडेत आरसीबीला धूतले! दिली 7 विकेट्सने मात

Surabhi Jagdish Thu, 11 Apr 2024-11:18 pm,

Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Live Score in Marathi: आयपीएलमधील 25 वा सामना आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये तळाशी असल्याने सामना जिंकण्याचा दोघांचाही प्रयत्न असेल.

Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Live Score in Marathi: आयपीएलमधील 25 वा सामना आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये तळाशी असल्याने सामना जिंकण्याचा दोघांचाही प्रयत्न असेल.

Latest Updates

  • वानखेडेत मुंबईच्या फलंदाजांनी आरसीबीच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. साऱ्या फलंदाजांनी आपले हात साफ करत आरसीबीला आपल्या होम ग्राउंडवर 7 विकेट्सने पराभूत केलं आहे.

  • विषकच्या 14 व्या ओव्हरमध्ये मुंबईने धाकड फलंदाजी करत असलेल्या सुर्यकुमार यादवला बाद केलं आहे. तिसऱ्या विकेटनंतर तिलक वर्मा हा फलंदाजीसाठी आला आहे.

  • 13 व्या मुंबईच्या सुर्याकुमार यादवने फक्त 17 बॉलमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. सुर्याच्या तूफानी खेळीत 5 चौकार आणि 4 षटकार लगावलेले आहेत.

  • विल जॅक्सच्या 12 व्या ओव्हरीत मुंबईचा स्टार फलंदाज रोहित शर्मा हा टॉप्लेने घेतलेल्या उत्कृष्ट कॅचमुळे 38 धावांवर बाद झाला आहे. रोहितच्या विकेटनंतर कॅप्टन हार्दिक पांड्या हा मैदानात आला आहे.

  • 10 ओव्हरनंतर मुंबई इडियन्सचा स्कोर 111-1 असा आहे. रोहित शर्मा 34 वर तर सुर्याकुमार यादव हा 5 धावांवर खेळत आहे. रोहित शर्माने वानखेडे स्टेडियमवर 100 षटकार ठोकण्याचा पण विक्रम आपल्या नावावर केला आहे.

  • आकाश दीपच्या 9 व्या ओव्हरमध्ये इशान किशन हा 69 धावांची ताबडतोब खेळी खेळून आउट झाला आहे. इशानच्या विकेटनंतर सुर्यकुमार यादव हा फलंदाजीसाठी आला आहे. 

  • सहाव्या ओव्हरमध्ये इशान किशनने 23 बॉलमध्ये 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने आपलं ताबडतोब अर्धशतक पूर्ण केलं आहे. इशानच्या इनिंगमुळे मुंबई चांगल्या स्थितीत दिसत आहे. 

  • 5 ओव्हरनंतर मुंबई इंडियन्सचा स्कोर 55-0 असा आहे. इशान किशन 39 वर, तर रोहित 14 वर खेळत आहे. आरसीबीला सामन्यात परत येण्यासाठी ही भागीदारी तोडण्याची गरज आहे. 

  • आरसीबीने मुंबईसमोर 20 ओव्हरमध्ये 196 धावांचा डोंगर उभा केला आहे. आरसीबीकडून फाफ डू प्लेसीने 61, रजत पाटीदारने 50, तर दिनेश कार्तिकने ताबडतोब 53 धावांच्या इनिंगच्या मदतीने आरसीबीने एवढा मोठा स्कोर उभा केला आहे. गोलंदाजीत मुंबईकडून बुमराहने कहर माजवत फलंदाजांना आपल्या इशाऱ्यावर नाचवलं आहे आणि आपला विकटांचा पंजा पण पूर्ण केला आहे. बुमराहसोबत, कोएट्झे, मधवाल आणि श्रेयस गोपालने प्रत्येकी एक विकेट घेतली आहे.

    तर आता बघण्यायोग्य गोष्ट असणार की मुंबई 2 गुण मिळवणार की बंगळुरू वानखेडेवर आज आपले वर्चस्व दाखवणार?   

  • 19 व्या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहने आपल्या बॉलिंगने कहर माजवला आहे, एकाच ओव्हरमध्ये सौरव आणि विषक या दोघांचे विकेट घेत बुमराहने आरसीबीच्या फलंदाजांचे कंबर मोडले आहे

  • 17 व्या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहने आरसीबीला एकाच ओह्रमध्ये दोन मोठे झटके दिले आहेत, फाफ डू प्लेसी आणि महिपाल लोमरोर हो दोघं तंबूत परतले आहेत. 

  • 15 ओव्हरच्या समाप्तीनंतर आरसीबीचा स्कोर 130-4 असा आहे, डू प्लेसी हा 58 तर, कार्तिक हा 6 धावांवर खेळत आहे. लवकर विकेट गमावल्यानंतर डू प्लेसी आणि पाटीदारच्या इनिंगमुळे आरसीबी मजबूत स्थितीत दिसत आहे.

  • आरसीबाचा कॅप्टन फाफ डू प्लेसीने 30 बॉलमध्ये 4 चौके आणि 1 षटकाराच्या मदतीने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. डू प्लेसीने आरसीबीच्या फलंदाजीची एक बाजू भक्कम पद्धतीने सांभाळून ठेवली आहे.

  • श्रेयस गोपालच्या 13 व्या ओव्हरमध्ये ग्लेन मॅक्सवेल हा शुन्याच्या स्कोरवर एलबीडब्लू आउट झाला आहे. मॅक्सवेलच्या विकेटनंतर अनुभवी फलंदाज दिनेश कार्तिक हा फलंदाजीसाठी आला आहे.

  • कोएट्झेच्या 12 व्या ओव्हरमध्ये रजत पाटीदारने लगोपाठ दोन षटकार लावत आपलं अर्धशतक पूर्ण केलं, पण त्यानंतर त्याच ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर पाटीदारला 50 च्या स्कोरवर आउट केलं आहे.

  • 10 ओव्हरच्या समाप्तीनंतर आरसीबीचा स्कोर आहे 89-2. डू प्लेसी आणि पाटीदार यांच्यात 66 धावांची भागीदारी झाली आहे. डू प्लेसी हा 39 तर पाटीदार हा 36 धावांवर खेळत आहे.

  • पाच ओव्हरनंतर आरसीबी चा स्कोर 35-2 असा आहे. फाफ डू प्लेसीस हा 18 धावांवर ता रजत पाटीदार हा 6 धावा बनवुन मैदानावर नाबाद आहे.

  • आकाश मधवालने चौथ्या ओव्हरमध्ये विल जॅक्सच्या स्वरूपात मुंबईला दुसरी विकेट मिळवुन दिली आहे. विल जॅक्स हा 8 धावा बनवुन तंबूत परतला आहे, दुसऱ्या विकेट नंतर रजत पाटीदार हा फलंदाजीसाठी आला आहे.

  • जसप्रीत बुमराहच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये बंगळुरूला मोठा धक्का बसला आहे. टीमचा स्टार फलंदाज विराट कोहली हा फक्त 3 धावा बनवुन बाद झाला आहे.

  • MI vs RCB टॉस अपडेट - मुंब इंडियन्सचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    MI प्लेइंग 11 -

    रोहित शर्मा, इशान किशन (w), टिलक वर्मा, हार्दिक पांड्या (C), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, आकाश मधवाल

    RCB प्लेइंग 11 -

    विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (W), विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (W), महिपाल लोमरोर, रीस टोपले, विजयकुमार विशाक, मोहम्मद सिराज, आकाश दीप

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link