GG vs MI WPL 2023 LIVE Streaming: कियारा अडवाणी, क्रिती सॅनन महिला प्रीमियर लीगमध्ये करणार परफॉर्मन्स

Sat, 04 Mar 2023-1:57 pm,

WPL 2023 GG vs MI LIVE Updates: नवी मुंबईत आजपासून महिला प्रीमियर लीगचा थरार रंगणार आहे. पहिल्यांदाच होणाऱ्या या लीगबद्दल प्रत्येक अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...कोणामध्ये होणार सामना, वेळ, स्थळ, प्रत्येक लाईव्ह अपडेट

WPL 2023 GG vs MI LIVE Updates: बहुप्रतीक्षित महिला प्रीमियर लीगचा (Women's Premier League 2023) थरार आजपासून रंगणार आहे. नवी मुंबईतील  DY पाटील स्पोर्ट्स अकादमी इथे या सोहळ्याचे भव्य उद्घाटन होणार आहे. पहिला सामना मुंबई आणि गुजरातमध्ये होणार आहे. मुंबईचं नेतृत्व हरमनप्रीत कौर तर गुजरातचे बेथ मुनी करणार आहे.  महिलांसाठीच्या नवीन T20 फ्रँचायझी लीगबद्दल तुम्हाला माहित असणे आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट जाणून घ्या एका क्लिकवर...


 

Latest Updates

  • Women’s Premier League (WPL) 2023 LIVE Updates :  बहुप्रतिक्षित ऐतिहासिक महिला IPL चा पहिला सामना उद्घाटनानंतर नियोजित वेळ सुरु होईल. संध्याकाळी 07.30 वाजता नाणेफेक होणार असून 08.00 वाजता  मुंबई आणि गुजरातमध्ये सामना रंगणार आहे. 

  • Women’s Premier League (WPL) 2023 LIVE Updates :  बहुप्रतिक्षित ऐतिहासिक महिला IPL (Women's Premier League) चं अँथम लाँच झालं आहे. 

  • Women’s Premier League (WPL) 2023 LIVE Updates : कियारा अडवाणी, क्रिती सॅनन आणि गायक रॅपर एपी धिल्लम आज नवी मुंबईतील डीवाय स्टेडियममधील Women’s Premier League उद्घाटन सोहळ्यात परफॉर्मन्स करणार आहेत.

  • Women’s Premier League (WPL) 2023 LIVE Updates :  आज मुंबई विरुद्ध गुजरात असा सामना नवी मुंबईतील डीवाय स्टेडियमला रंगणार आहे. यापूर्वी WPL अँथम लाँच होणार आहे. 

  • Women’s Premier League (WPL) 2023 LIVE Updates :  सोशल मीडियावरही WPL फिव्हर पाहिला मिळतं आहे. यू सूर्यास्त क्यों नहीं नहीं हो रहा हैं असं ट्वीट शेअर करण्यात आलं आहे. 

  • Women’s Premier League (WPL) 2023 LIVE Updates :  
    मुंबई इंडियन्स संघातील खेळाडू

    हरमनप्रीत कौर, नॅट सायव्हर-ब्रंट, अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, यास्तिका भाटिया, हीदर ग्रॅहम, इस्सी वोंग, अमनजोत कौर, धारा गुजर, सायका इशाक, हेली मॅथ्यूज, क्लो ट्रायॉन, प्रियांका बाला, हुमैरा काझी, कलिताम, नीती, नीती सोनम यादव

  • Women’s Premier League (WPL) 2023 LIVE Updates :  

    लाइव्ह स्ट्रीमिंगसाठी, JIO CINEMA ने हक्क मिळवले आहेत आणि सर्व सामने त्याच्या अॅपवर उपलब्ध राहणार आहेत.  JIO सिनेमा अॅप दुपारचे सामने: 3:30 PM तर  संध्याकाळचे सामने: 7:30 PM ला पाहता येणार आहे. आज नवी मुंबईतील डीवाय स्टेडियमवर या सोहळाचं थाट्यात उद्घाटन होणार आहे. 

  • Women’s Premier League (WPL) 2023 LIVE Updates :  
    Viacom 18 कडे 2023 मध्ये महिला प्रीमियर लीगचं प्रसारण अधिकार आहेत. प्रेक्षकांना WPL 2023 थेट पाहण्यासाठी स्पोर्ट्स 18 नेटवर्क चॅनेलवर ट्यून करू शकतात. WPL 2023 लिलाव स्पोर्ट्स 18 1 SD/ 1 HD चॅनेलवर थेट प्रसारित केला जाईल.

  • Women’s Premier League (WPL) 2023 LIVE Updates : या आयपीएकमधील भारताची स्मृती मनधाना ही सर्वात महागडी खेळाडू ठरली असून तिच्यावर 3.40 कोटी रुपयाची बोली लागली होती. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 19 वर्षांच्या ऋचा घोषला 1.9 कोटी रुपयांत विकत घेतलं. तर ऑस्ट्रेलियाची दिग्गज एलिसा हिली हिच्यावर यूपी वॉरिअर्सने 70 लाख रुपयांची बोली लावून आपल्या तंबूत घेतले. 

  • Women’s Premier League (WPL) 2023 LIVE Updates : 

     ऐतिहासिक महिला IPL (Women's Premier League) साठीचा पहिला लिलाव मुंबईच्या जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झाला होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) प्रथमच आयपीएलच्या धर्तीवर या स्पर्धेचे आयोजन केल आहे. WPL 2023 लिलावासाठी 409 खेळाडूंपैकी 246 भारतीय होते. तर आठ सहयोगी देशांसह 163 खेळाडू परदेशी होते. 

  • Women’s Premier League (WPL) 2023 LIVE Updates :  गुजरात संघातील खेळाडू

    अॅशले गार्डनर, बेथ मूनी, सोफिया डंकले, अॅनाबेल सदरलँड, हरलीन देओल, डिआंड्रा डॉटिने, स्नेह राणा, एस मेघना, जॉर्जिया वेरहम, मानसी जोशी, डी हेमलता, तनुजा कवर, मोनिका पटेल, सुषमा वर्मा, हर्ले गाला, अश्विनी कुमारी, पारुनिका सिसोदिया आणि शबनम शकील

  • Women’s Premier League (WPL) 2023 LIVE Updates : 
    लीगमधील (WPL 2023 Live) दुसरा सर्वात महागडा संघ INR 912.99 कोटी मुंबई इंडियन्स आहे. मुंबई इंडियन्सचं नेतृत्त्व हरप्रीत कौर करणार आहे. इंग्लंडचा नॅट सायव्हर-ब्रंट आणि वेगवान गोलंदाज इस्सी वोंग, न्यूझीलंडची अमेलिया केर, दक्षिण आफ्रिकेची टी20 विश्वचषक अंतिम फेरीतील क्लोए ट्रायॉन, वेस्ट इंडिजचा कर्णधार हेली मॅथ्यू आणि ऑस्ट्रेलियाचा संघ असलेल्या स्टार-स्टड्ड एमआय संघाची जबाबदारी दिली आहे. 

  • Women’s Premier League (WPL) 2023 LIVE Updates : आयपीएलमधील पाच संघाचे कर्णधार कोण आहे यावर एक नजर टाकूयात 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

  • Women’s Premier League (WPL) 2023 LIVE Updates : 

    आयपीएल संघांत रिलायन्सने मुंबई इंडियन्स, जेएसडब्ल्यू आणि जीएमआर समूहाला दिल्ली कॅपिटल्स, आणि डियाजिओने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विकत घेतलं आहे. यंदा दोन नवीन मालक या स्पर्धेत सहभागी झाले आहे.  अदानी स्पोर्ट्सलाइनने अहमदाबादस्थित गुजरात जायंट्स विकत घेतली आहे. कॅप्री ग्लोबल या कंपनीने यूपी फ्रँचायझी यूपी वॉरियर्स विकत घेतली आहे. 

  • कुठे आणि किती वाजता पाहता येणार सामना?

    महिला प्रीमियर लीगला थरार स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर पाहता येणार आहे. मुंबई इंडियन्स ( mumbai indians) आणि गुजरात जायंट्स  (gujarat giants)यांच्यात संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. 

  • कुठे आणि किती वाजता पाहता येणार सामना?

    महिला प्रीमियर लीगला थरार स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर पाहता येणार आहे. मुंबई इंडियन्स ( mumbai indians) आणि गुजरात जायंट्स  (gujarat giants)यांच्यात संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. 

  • Women’s Premier League (WPL) 2023 LIVE Updates : 22 दिवस चालणाऱ्या फ्रँचायझी T20 स्पर्धेत पाच संघ अहमदाबाद, मुंबई, बेंगळुरू, दिल्ली आणि लखनऊ एकमेकांशी भिडणार आहेत. राउंड रॉबिन टप्प्यात पाच संघ एकमेकांशी दोनदा खेळतील. त्यामुळे प्रति संघ आठ सामने आणि 20 लीग गेम खेळणार आहेत. 

  • Women’s Premier League (WPL) 2023 LIVE Updates : 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    WPL थरार कुठे रंगणार? (Where will the WPL)

    WPL थरार रंगणार आहे नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर... तर ब्रेबॉर्न स्टेडियमवर 26 मार्च 2023 ला अंतिम सामना होणार आहे. या स्पर्धेत पाच संघांमध्ये एकूण 22 सामने होणार आहेत. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link