नवी दिल्ली : कॅच घ्या आणि मॅच जिंका, असे साधारणपणे बोलले जाते. कारण क्रिकेटची मॅच जिंकण्यासाठी कॅच घेणे गरजेचे आहे, हे आपण सर्वच जाणतो. इतकंच काय तर कोणी कॅच घेतली तर त्या क्रिकेटरला आणि त्याचबरोबर प्रेक्षकांना होणारा आनंद काही औरच असतो. मात्र काही कॅच इतक्या कठीण असतात की ती कॅच जर कोणी घेतली तर आपण आनंदाचाबरोबरच आश्चर्यही व्यक्त करतो. आणि त्या खेळाडूचे होणारे कौतूक तर काही वेगळेच असते. 


एक वेगळा कॅच


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅच घेतल्याने हातातून सुटत चाललेला खेळही हाती येतो. ही क्षमता इंडियन क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीकडे होती. मात्र एका लोकल खेळाडूने घेतलेली कॅच जर तुम्ही पाहीली तर तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.


आपला देश क्रिकेटसाठी अक्षरशः वेडा आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यामुळे आतापर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कॅच पाहिल्या असतील. हातातून सुटत चाललेली कॅच पुन्हा झेलल्याचे तुम्ही पाहिले असेल. सुपरमॅनसारखे हवेत झेलली कॅच तुम्ही पाहिली असेल. 


कॅच झेलणाऱ्यांच्या यादीत जोंटी रोड्स, मोहम्मद कैफ, युवराज सिंग, रिकी पोंटिंग, हर्शल गिब्स यांसारखे अनेक खेळाडूंचा समावेश आहे.


व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल


आता या लोकल क्रिकेट मॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो पाहुन तुम्ही वाह केल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ नक्की कुठला आहे याची माहिती अजूनतरी मिळालेली नाही. मात्र या मॅचमध्ये एक जबरदस्त कॅच पाहायला मिळते. त्याची प्रत्येकजण तारीफ करेल. व्हिडिओत तुम्ही बघाल की, बाऊंड्री लाईनवर उभा असलेला खेळाडू कशाप्रकारे कॅच पकडतो आणि जसा तो स्वतः बाऊंड्री लाईन पार करतो तो बॉल दुसऱ्या खेळाडूकडे फेकतो आणि दुसरा खेळाडू हवेत उडी मारून कॅच पकडतो. ते पाहून टाळ्यांची बरसात होते.


तारीफ पे तारीफ...


हा व्हिडिओ कुठला आहे हे जरी समजले नसले तरी हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्यावर मजेदार कमेंट्स आल्या आहेत. त्याचबरोबर या कॅचवर व खेळाडूवर सुस्तीसुमने उधळली जात आहेत.