GT vs RR IPL 2022 Final: उमरान नाही तर हा खेळाडू ठरला सर्वात वेगवान चेंडू टाकणारा गोलंदाज; फायनल सामन्यात केला पराक्रम
आयपीएल 2022 चा अंतिम सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सुरु आहे.
मुंबई : आयपीएल 2022 चा अंतिम सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सुरु आहे. या सामन्यापुर्वी सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम भारतीय गोलंदाज उमरान मलिकच्या नावे होती. मात्र आता हा विक्रम मोडला आहे. फायनल सामन्यात हा विक्रम मोडला गेला आहे.
राजस्थानचा संघ प्रथम फलंदाजी करत आहे. या सामन्यादरम्यान गुजरातचा गोलंदाज लॉकी फर्ग्युसनकडे गोलंदाजी दिली होती. यावेळी फर्ग्युसनने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू टाकला. त्याने 157.3 किमी प्रतितास वेगाने चेंडू फेकला. या गोलंदाजीसह फर्ग्युसनने उमरान मलिकचा विक्रम मोडला आहे.
गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने फर्ग्युसनला ५ वे षटक दिले. यादरम्यान फर्ग्युसनने षटकातील सर्वात वेगवान चेंडू टाकला. त्याने हा चेंडू ताशी 157.3 किलोमीटर वेगाने फेकला. फर्ग्युसनने त्याच षटकातील चौथा चेंडूही वेगाने टाकला. त्याने हा चेंडू ताशी 153 किलोमीटर वेगाने फेकला. फर्ग्युसनपूर्वी शॉन टेटनेही ताशी १५७.३ किलोमीटर वेगाने चेंडू फेकला आहे.
उमरान मलिकने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू टाकला. सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरानने 157 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला. फर्ग्युसनने अंतिम सामन्यात उमरानचा विक्रम मोडला.
सर्वात जलद गोलंदाजी
लॉकी फर्ग्युसन - १५७.३ किमी/ता
शॉन टेट - १५७.३ किमी/ता
उमरान मलिक - १५७ किमी/