मैदानाबाहेरही लोकेश राहुलचं `टायमिंग` चुकलं, ट्विटरवर ट्रोल
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये भारताचा ६० रननी पराभव झाला आहे.
साऊथम्पटन : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये भारताचा ६० रननी पराभव झाला आहे. याचबरोबर भारतानं ५ टेस्ट मॅचची ही सीरिज ३-१नं गमावली. विराट कोहली वगळता भारताच्या इतर बॅट्समनना चमकदार कामगिरी करता आली नाही. भारताच्या ओपनरनी या सीरिजमध्ये एकही अर्धशतकी खेळी केली नाही. भारताचा ओपनर असलेल्या लोकेश राहुलला ट्विटरवर रोशाचा सामना करावा लागला आहे.
ईशांत शर्मा याचा वाढदिवसाला शुभेच्छा देणारं एक ट्विट लोकेश राहुलनं केलं. या ट्विटनंतर राहुलवर टीकेचा भडीमार सुरु झाला. मैदानाबाहेरही राहुलचं टायमिंग चुकलं. तू फक्त मॉडेलिंगच कर. हरल्यानंतर ट्विट करायला काहीच वाटत नाही का? अशी टीका राहुलवर करण्यात आली आहे.
लोकेश राहुलनं पहिल्या टेस्ट मॅचमध्ये ४ आणि १३, दुसऱ्या टेस्टमध्ये ८ आणि १०, तिसऱ्या टेस्टमध्ये २३ आणि ३६ आणि चौथ्या टेस्टमध्ये १९ आणि शून्य रनवर आऊट झाला.