मुंबई : माजी ज्युनियर राष्ट्रीय चॅम्पियनशिप कुस्तीपटू सागर राणा (Sagar Rana) याच्या हत्येप्रकरणी ऑलिम्पिक मेडलिस्ट सुशीलकुमारला लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. (Look out notice to Olympic medalist Sushilkumar) हत्या झाल्यानंतर सुशीलकुमार हा फरार आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्यासाठी त्याच्या घरावर छापा टाकला होता. आता तो देश सोडून जाऊ नये म्हणून लूक आऊट नोटीस बजावण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 कुस्तीपटूच्या हत्येप्रकरणात  ऑलिम्पिक मेडलिस्ट सुशीलकुमारचे नाव असल्याचाने त्याचा शोध सुरु करण्यात येत आहे. दरम्यान कुस्तीपटूच्या हत्येनंतर सुशीलकुमार फरार असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुशीलच्या घरावर छापा टाकला.  23 वर्षीय कुस्तीपटूच्या हत्येप्रकरणी सुशीलकुमार फरार आहे. दिल्ली, उत्तराखंड, हरियाणात सुशीलकुमारला पकडण्यासाठी छापेमारी करण्यात आली.



दोन गटांत जोरदार हाणामारी झाली.  या भांडणामध्ये दोन इतर खेळाडू देखील जखमी झाले आहेत. मृत व्यक्तीचे नाव सागरकुमार असल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी सुशीलकुमार पळून गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाले आहे. या कॅमेऱ्याच्या मदतीने पोलिसांचा तपास सुरु केला आहे. रात्री 12 च्या सुमारास कुस्तीपटूंच्या दोन गटात वाद झाल्याची माहिती पोलिसांननना मिळाली होती. त्यानुसार घटनास्थळी दाखळ होऊन पोलिसांनी जखमी खेळाडूंना रुग्णालयात दाखल केले. सागरची प्रकृती अधिक खालवल्याने त्याला दिल्लीतील ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. बुधवारी उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. 


दरम्यान, हाणामारी झालेल्या ठिकाणाहून पोलिसांनी एक डबल बॅरल बंदूक जप्त केली आहे. या प्रकरणी एक प्रिन्स दलाल नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आलीआहे. दरम्यान, सुशीलकुमार यांच्यासह आणखी काही व्यक्तींचा शोध घेण्यासाठी अनेक पथके तयार केली गेली आहेत. आम्ही सुशीलकुमार याच्या भूमिकेची चौकशी करीत आहोत कारण त्याच्यावर आरोप झालेले आहेत, आम्ही आमच्या टीमला त्याच्या घरी पाठवले पण तो सापडला नाही, अशी माहिती नवी दिल्लीचे सहाय्यक उपपोलीस आयुक्त-१ यांनी एएनआयला दिली.