IPL 2018: ११व्या हंगामात मुंबईच्या नावावर लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद
आयपीएलच्या ११व्या हंगामातील २३व्या सामन्यात हैदराबादने मुंबईला ३१ धावांनी हरवले. यंदाच्या आयपीएलमधील हैदराबाचा सहा सामन्यांतील पाचवा विजय आहे. तर मुंबईला एकूण पाच सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला. हैदराबादने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ११८ धावा केल्या होत्या. मुंबईला हे सोपे आव्हानही पूर्ण करता आले नाही.
मुंबई : आयपीएलच्या ११व्या हंगामातील २३व्या सामन्यात हैदराबादने मुंबईला ३१ धावांनी हरवले. यंदाच्या आयपीएलमधील हैदराबाचा सहा सामन्यांतील पाचवा विजय आहे. तर मुंबईला एकूण पाच सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला. हैदराबादने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ११८ धावा केल्या होत्या. मुंबईला हे सोपे आव्हानही पूर्ण करता आले नाही.
हैदराबादनं ठेवलेल्या ११९ रनचं आव्हानही मुंबईला पार करता आलं नाही. या मॅचमध्ये मुंबईचा ८७ रनवर ऑल आऊट झाल्यामुळे मुंबईचा ३१ रननी पराभव झाला आहे. यंदाच्या आयपीएलमधल्या ६ मॅचमध्ये मुंबईचा हा पाचवा पराभव आहे. त्यामुळे प्ले ऑफमध्ये क्वालिफाय करण्यासाठी मुंबईचा रस्ता आणखी खडतर झाला आहे. ११९ रनचा पाठलाग करताना मुंबईला लागोपाठ धक्के बसत होते.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील हा सर्वात कमी स्कोर आहे. आयपीएलमध्ये सर्वात कमी स्कोर करुन सामना जिंकण्याचा रेकॉर्ड चेन्नईच्या नावावर आहे. चेन्नईने २००९मध्ये पंजाबविरुद्ध ११६ धावा केल्या होत्या. यानंतरही पंजाबला विजय मिळवता आला नाही. चेन्नईने हा सामना २४ धावांनी जिंकला.