मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सामने अंतिम टप्प्यात आले आहेत. लखनऊ विरुद्ध कोलकाता झालेल्या सामन्यात बुधवारी एका तरुणीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आयपीएलममध्ये यंदा अनेक वेगवेगळ्या मिस्ट्री गर्ल पाहायला मिळाल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लखनऊ विरुद्ध पंजाब सामन्यात खास एका मिस्ट्री गर्लचं दर्शन झालं मग काय विचारता सगळ्यांचा नजरा तिच्यावर खिळल्या. डी वाय पाटील स्टेडियममध्ये या तरुणीवर सगळ्यांच्या नजरा पडल्या आणि तिचे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. 


ही मिस्ट्री गर्ल कोण आहे याची माहिती सध्या समोर आली नाही. मात्र तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल  झाला आहे. ती टाळ्या वाजवताना दिसत आहे. ही कोणत्या टीमला सपोर्ट करत होती ते अजून समजू शकलं नाही. 



कोलकाता विरुद्ध झालेल्या सामन्यात लखनऊने कोलकाताचा 2 धावांनी पराभव केला आणि प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केलं. प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्सने कोलकाता नाइट रायडर्ससमोर विजयासाठी 211 धावांचे लक्ष्य ठेवले. 


प्रत्युत्तरात कोलकाता नाईट रायडर्सचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 208 धावाच करू शकला आणि सामना गमावला. कोलकाता प्लेऑफमधून बाहेर जाऊ शकते.