LSG vs PBKS : टीम इंडियाला मिळाला नवा `ब्रेट ली`, आयपीएलच्या डेब्यू ओव्हरमध्येच रचला इतिहास
Who is Mayank Yadav : पंजाब किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्सकडून मयंक यादवने आपल्या धारदार गोलंदाजीचं प्रदर्शन करत स्पीडची ताकद दाखवली. त्याने या सामन्यात रेकॉर्ड ब्रेक बॉल देखील टाकला.
LSG vs PBKS, IPL 2024 : लखनऊच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर शनिवारी पंजाब किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्सकडून मयंक यादवने (Mayank Yadav) इंडियन प्रीमियर लीगमध्ये पदार्पण केलं. या सामन्यात मयंकने धारदार गोलंदाजी करत पंजाबचं कंबरडं मोडलं. 21 वर्षीय मयंक यादवने यंदाच्या आयपीएल हंगामातील सर्वात फास्ट (155.8 KMPH) बॉल टाकलाय. विशेष म्हणजे मयंकने डेब्यू ओव्हरमध्येच ही किमया करून दाखवली. मयंकच्या गोलंदाजीसमोर जॉनी बेअरस्टोच्या डोळ्याला अंधारी आली अन् आपल्या गतीच्या जोरावर मयंकने बेअरस्टोची (Jonny Bairstow) विकेट काढली. मयंक यादवने जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग आणि जितेश शर्मा यांना तंबूत पाठवलं अन् पंजाबचा संघ अडचणीत सापडला. त्यामुळे आता मयंक यादवच्या रुपात टीम इंडियाला नवा ब्रेट ली मिळालाय, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
कोण आहे मयंक यादव?
मयंक यादव हा भारताचा उजव्या हाताचा वेगवान मध्यम गोलंदाज आहे. त्याने 2021 मध्ये हरियाणाविरुद्ध दिल्लीसाठी लिस्ट ए मध्ये पदार्पण केलं आणि तीन विकेट्स घेतल्या. पुढच्या वर्षी, मयंकने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये टी-20 आणि रणजी ट्रॉफीमध्ये प्रथम श्रेणी पदार्पण केलं होतं. डोमेस्टिक सर्किटमध्ये चांगल्या कामगिरीनंतर, त्याने इंडियन टी-20 लीगसाठी लखनऊ फ्रँचायझीसोबत करार केला. मयंक देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व करतो. त्याने 10 टी-20 आणि 17 लिस्ट ए सामने खेळले आहेत आणि एकूण 46 विकेट्स त्याने घेतल्या आहेत.
लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, आयुष बडोनी, निकोलस पूरन (C), मार्कस स्टॉइनिस, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, मयंक यादव, मणिमरन सिद्धार्थ.
पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): शिखर धवन (C), जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, जितेश शर्मा, शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग.