KL Rahul Wicket: मॅचमध्ये अजब ड्रामा, शेवटच्या सेकंदाला DRS आणि निर्णय आला....
बंगळुरूच्या बाजूने दिलेला निर्णय तुम्हाला पटला का? पाहा व्हिडीओ
मुंबई : आयपीएलमधील 31 वा सामना बंगळुरू टीमने जिंकला आहे. लखनऊ विरुद्ध झालेल्या सामन्यात 18 धावांनी विजय मिळवला. हा सामना अनेक अर्थानं चुरशीचा ठरला. मधल्या ओव्हर्समध्ये अख्खा गेम फिरला आणि के एल राहुलच्या हातून सामना गेला.
कॅप्टन के एल राहुल बॅटिंग करत असताना एक वादग्रस्त निर्णय झाला. त्यामुळे लगेच DRS ची मागणी करण्यात आली. के एल राहुल आऊट आहे की नाही यासाठी DRS घेण्यात आला. अंपायरने निर्णय बंगळुरूच्या बाजूने दिला.
हर्षल पटेलनं टाकलेला बॉल स्टंम्पच्या बाहेर गेल्याचं दिसलं त्यामुळे RCB च्या कोणत्याच खेळाडूनं यावर आक्षेप घेतला नाही. पण अचानक शेवटच्या सेकंदाला RCB ने DRS ची मागणी केली.
या सगळ्यामुळे काही मिनिटं मैदानात ड्रामा रंगला. DRS मध्ये बॉल राहुलच्या बॅटला हळूवार लागून गेल्याचं दिसलं आणि त्यामुळे के एल राहुलला अंपायरने आऊट दिलं. अंपायरच्या निर्णयावर के एल राहुल देखील एक क्षण हैराण झाला.
एका DRS ने मैदानातील अख्खं वातावरण बदलून टाकलं. के एल राहुल 30 धावा करून आऊट झाला. बंगळुरू टीमने 18 धावांनी लखनऊवर विजय मिळवला. बंगळुरूने 181 धावा 6 विकेट्स गमावून केल्या. लखनऊसमोर विजयासाठी 182 धावांचं लक्ष्य होतं. मात्र के एल राहुलची टीम 18 धावांसाठी कमी पडली आणि सामना हातून गेला.