मुंबई : IPL 2022 चा 7 वा सामना CSK आणि लखनऊ टीम यांच्यात खेळला गेला. या सामन्यात केएल राहुलच्या नेतृत्वाखाली लखनऊ जाएंट्स विजयी ठरली. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने लखनऊला विजयासाठी 211 रन्सचं लक्ष्य दिलं होतं. यावेळी लखनऊने चेन्नईला कडवी झुंज देत अखेर विजयासह सामना संपवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान याच सामन्यामध्ये केएल राहुलसोबत एक विचित्र घटना घडली. या गोष्टीचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


सामन्यादरम्यान हरवला राहुलचा बूट


कालच्या सामन्यात कर्णधार केएल राहुलने वेगवान खेळी खेळली. अवघ्या 26 बॉलमध्ये त्याने 2 चौकार आणि 3 सिक्सच्या मदतीने 40 रन्स केले. पण, मॅचमध्ये बॅटिंगदरम्यानच त्याचा बूट अचानक हरवला. यावेळी त्याचा सहकारी क्विंटन डी कॉकने राहुलला बूट शोधण्यात मदत केली.



ही संपूर्ण घटना पहिल्या ओव्हरमध्ये घडली. मुकेश चौधरी ओव्हर टाकत होता. या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर, राहुल हलक्या हाताने शॉट खेळून रनसाठी धावला. मात्र, यादरम्यान दव पडल्याने त्याचा बूट पायातून निघाला. यानंतर क्विंटन डी कॉकने त्याला निघालेला बूट नेऊन दिला.


आयपीएलच्या 15 व्या सिझनमध्ये गतविजेती टीम चेन्नई सुपर किंग्जला दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. लखनऊ सुपर जाएंट्सने चेन्नईचा 6 विकेट्सने पराभव केला. मुळात चेन्नई विजयाच्या जवळ होती मात्र अखेरीस गोलंदाजांच्या कामगिरीमुळे पराभवाचा सामना करावा लागला.