IPL सुरु होण्यापूर्वी के.एल राहुलचं टेन्शन वाढलं; `हा` मॅचविनर खेळाडू आयपीएलबाहेर!
IPL 2024 Lucknow Super Giant : उद्यापासून आयपीएलचा 17 वा हंगामा सुरु होणार आहे. पहिला सामना सीएसके आणि आरसीबी यांच्यात रंगणार आहे. तर दुसरीकडे लखनऊ सुपर जायंट्स या संघातून मोठी बातमी समोर येत आहे.
IPL 2024 Lucknow Super Giant News: आयपीएलचा 17 वा हंगामा उद्यापासून म्हणजे 22 मार्चपासून सुरु होत आहे. सर्वच संघांनी जेतेपदासाठी जोरदार तयारी सुरु आहे. तर दुसरकीकडे लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी संधी दिसी आहे. परंतु के एल राहुलला (KL Rahul) सुरुवातीला कमी प्रमाणाच कामाचा ताण घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हैदराबादमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान राहुलला दुखापत झाली होती. मात्र आता एनसीएने राहुलला खेळण्यास मान्यता दिली आहे आणि तो लखनऊ संघात सामील देखील होऊ शकतो. त्याला सुरुवातीला विकेटकीपिंग न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि सुरुवातीच्या सामन्यांमध्ये फक्त फलंदाज म्हणून खेळणार आहे. लखनऊ संघात जरी कर्णधार परतला असेल तरी लखनऊ संघातूनच दुसरी टेन्शन देणारी बातमी समोर येत आहे.
आयपीएलच्या 17 वा हंगातून खेळाडू बाहेर जाण्याचे सत्र सुरुच आहे. आतापर्यंत मोहम्मद शमी, जेसन रॉय आणि प्रसिद्ध कृष्णासारखे प्रसिद्ध खेळाडू दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. आता लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) च्या संघातून इंग्लंडचा वेगवान गोलंदाज डेव्हिड विलीने वैयक्तिक कारणांमुळे आयपीएल 2024 मधून बाहेर पडला आहे. यासंदर्भात लखनऊ संघाचे कोच जस्टिन लैंगर डेविड विली यांनी सांगितले की, मार्क वुड याआधीच संघातून बाहेर पडला आहे आणि आता डेविड विलीपण वैयक्तिक कारणामुळे बाहेर पडला आहे. पण गेल्या काही दिवसांत पाहिलं आहे की, आपल्याकडे अनुभवी खेळाडूंची कमतरता नाही. संघातील काही खेळाडूंना दुखापत झाली होती, मात्र सध्या सर्वजण पूर्णपणे तंदुरुस्त आहेत. सर्व खेळाडू निरोगी आहेत आणि खेळण्यासाठी सज्ज आहेत. डेव्हिड विलीला एलएसजीने लिलावात 2 कोटी रुपयांना विकत घेतले होते, परंतु सध्या त्याच्या खेळाबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.
24 मार्च - राजस्थान रॉयल्स वि. लखनऊ सुपर जायंट्स, दुपारी 3.30 वा.पासून, जयपूर
30 मार्च - लखनऊ सुपर जायंट्स वि. पंजाब किंग्स, रात्री 8 वा. पासून, लखनऊ
7 एप्रिल - लखनऊ सुपर जायंट्स वि. गुजरात टायटन्स, रात्री 8 वा. पासून, लखनऊ
लखनऊ सुपर जायंट्सचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन- केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, निकोलस पूरन, मार्कस स्टॉइनिस, क्रुणाल पांड्या, आयुष बडोनी, शिवम मावी, रवी बिश्नोई, मोहसिन खान आणि शामर जोसेफ.