लखनऊमध्ये के एल राहुलकडून `या` खेळाडूला संधी, मोडला 8 वर्षांचा रेकॉर्ड
के एल राहुल मोडणार 8 वर्षांचा रेकॉर्ड, गेल्या 8 वर्षांत असं काय घडलं नव्हतं जे आता होणार...पाहा
मुंबई : आयपीएल सुरु होण्यासाठी आता तीन दिवस बाकी आहेत. सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी लखनऊ संघातील इंग्लंडच्या स्टार खेळाडूनं आपलं नाव मागे घेतलं आहे. त्यामुळे लखनऊ संघाला मोठा धक्का बसला. त्याच्या जागी आता एका विशेष खेळाडूला स्थान देण्यात आलं आहे.
8 वर्षांचा अनोखा रेकॉर्ड मोडत विशेष खेळाडूला आयपीएलमध्ये स्थान देण्यात आलं आहे. लखनऊ संघात परदेशी स्टार बॉलरची गरज होती. लखनऊला झिम्बावे संघातून हा स्टार बॉलर मिळाला आहे. लखनऊने झिम्बावेकडून हा स्टार खेळाडू घेतला आहे.
लखनऊ संघाने याबाबत अधिकृत घोषणा अद्याप केली नसली तरी झिम्बावेच्या ट्वीटर हॅण्डलवरून याचे संकेत मिळत आहेत. 25 वर्षांचा झिम्बावेचा खेळाडू भारतात आयपीएल खेळण्यासाठी येणार असल्याची चर्चा आहे. जर असं झालं तर 8 वर्षांचा रेकॉर्ड मोडला जाईल.
गेल्या 8 वर्षांमध्ये झिम्बावेचा एकही खेळाडू आयपीएलमध्ये खेळला नाही. त्यामुळे यंदा पहिल्यांदाच झिम्बावेचा खेळाडू आयपीएल सामना खेळणार आहे. 25 वर्षांच्या ब्लेसिंगने 6 कसोटी सामन्यात 19 विकेट्स घेतल्या आहेत. 30 वन डे सामन्यात 39 विकेट्स घेतल्या आहेत. 21 टी 20 सामन्यात 25 विकेट्स घेतल्या आहेत.
गेल्या 8 वर्षांत झिम्बावेचा एकही खेळाडू आयपीएल खेळला नाही. मात्र यंदा तो खेळण्याची शक्यता आहे. ब्लेसिंग यापूर्वी 2014 मध्ये हैदराबादमधून खेळला होता. मात्र त्यावेळी त्याला एकही सामना खेळण्याची संधी दिली नाही.
झिम्बावेचे राजदूत विजय खंडूजा यांनी ब्लेसिंग मुजारबानीची भेट घेऊन भारतात जाण्याची परवानगी दिली आहे. यासोबत त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यावरून ब्लेसिंग भारतात लखनऊ संघाकडून खेळण्यासाठी येत असल्याचे संकेत मिळत आहेत.