मुंबई : क्रिकेटच्या मैदानावर खुलणारा खेळाडूंचा Romance सध्या चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीचत दीपक चाहर या खेळाडूनं त्याच्या प्रेयसीशी भर मैदानातच साखरपुडा उरकून टाकला. तुम्हाला माहितीये का, कॅप्टन कूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महेंद्र सिंह धोनी यानंही काहीशा अशाच अंदाजात गर्लफ्रेंडला आश्चर्याचा धक्का दिला होता. (MS Dhoni)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका कार्यक्रमादरम्यान, त्यानं हा किस्सा सांगितला होता. साक्षीसोबतच्या माहिच्या नात्याला जवळपास 2 वर्षे झाली होती. तो जेव्हा ऑस्ट्रेलियाला सामना खेळण्यासाठी गेला होता तेव्हाच व्हॅलेंटाईन्स डे होता. ही दोघंही फोनवर बोलत असतानाच आपलं साक्षीवर किती प्रेम आहे हे धोनीला व्यक्त करायचं होतं. पण, त्याच्या तोंडातून 'आय लव्ह यू' ऐवजी 'विल यू मॅरी मी' हे शब्द निघाले आणि बस्स मग काय, प्रेम व्यक्त होण्यापूर्वीच त्यानं थेट लग्नाचीच मागणी घातली. 


माही आणि साक्षीनं पुढे जाऊन या प्रपोजला गांभीर्यानं विचार करत सहजीवनाची एक नवी सुरुवात केली. सेलिब्रिटी जोड्यांच्या यादीत आज महेंद्रसिंह धोनी आणि त्याची पत्नी साक्षीचं नाव घेतलं जातं. 


क्रिकेटच्या मैदानात माहिच्य़ा अनेक सामन्यांच्या वेळी साक्षीची हजेरी पाहायला मिळाली आहे. तर, क्रिकेटपासून दूर असताना माही साक्षीला पूर्ण वेळ देण्यासोबतच ही जोडी मिळून काही धम्माल कामंही करते. मग ते फार्महाऊस परिसरात शेती करणं असो किंवा कलाक्षेत्रात निर्मिती विभागाचं काम असो. एक आदर्श जोडी म्हणूनच माही आणि साक्षीकडे पाहिलं जातं.