Manu Bhaker Won Bronze: `जेव्हा आईने पिस्तुल लपवलं,` पण आज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरने रचला इतिहास
भारतीय नेमबाज मनू भाकरने पॅरिसमध्ये ऑलिम्पिकस्पर्धेत इतिहास रचला होता. पण हा प्रवास इतका सोपा नव्हता. एक वेळ अशी होती जेव्हा मनू भाकरच्या आईने तिचं पिस्तुल लपवलं होतं.
भारतीय नेमबाज मनू भाकरने पॅरिसमध्ये ऑलिम्पिकस्पर्धेत इतिहास रचला होता. पण हा प्रवास इतका सोपा नव्हता. एक वेळ अशी होती जेव्हा मनू भाकरच्या आईने तिचं पिस्तुल लपवलं होतं.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाज मनू भाकरने कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. भारताचं मेडलचं खातं उघडणारी मनू भाकर ही पहिली भारतीय महिला ठरली आहे. पण मनू भाकरचा हा प्रवास इतका सोपा नव्हता. मनूवर एक वेळ अशी आली होती, जेव्हा तिच्या आईने नेमबाजीचं पिस्तुल लपवून ठेवलं होतं.
टोकियोमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे तिचे स्वप्न भंगल्यानंतर मनू भाकरला नेमबाजीला अलविदा करायचे होते. तिच्या पिस्तुलाने तिचा विश्वासघात केला होता. पण अथक प्रयत्न करुन वयाच्या 22 व्या वर्षी मनूने ते केले आहे जे तिच्या आधी कोणतीही महिला नेमबाज करू शकली नाही.
मनूने नेमबाजीत ऑलिम्पिक पदकासाठी भारताची 12 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवली. ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली. 22 वर्षीय मनू भाकरने आपल्या कृतीतून संपूर्ण जगाचा लक्ष वेधलं आहे. तीन वर्षांपूर्वी मनू भाकर तिच्या पहिल्या ऑलिम्पिकमधून रिकाम्या हाताने मायदेशी परतावं लागलं होतं. त्यावेळी तिची अपेक्षा अपूर्ण राहिली होती.
टोकियात मिळालं अपयश
टोकियोमधील अपयश मिळाल्यानंतर या गोष्टी सहन करणे कठीण झाले होते. 2023 मध्ये, मनू भाकरला नेमबाजी कंटाळवाणी वाटू लागली. एवढंच नव्हे तर तिच्यासाठी "9 ते 5 काम" असल्यासारखं तिला भासू लागलं. मनूने वयाच्या 14 व्या वर्षी पिस्तूल आणि नेमबाजी सोडण्याचा निर्णय घेतला. या काळात तिच्या आईने पिस्तुल लपवून ठेवलं. कारण टोकियामध्ये मिळालेलं अपयश मनूसाठी खूप मोठा धक्का होता. तिला खेळ सोडून परदेशात उच्च शिक्षण घ्यायचे होते. मनू भारतीय राष्ट्रीय संघाचा भाग होती आणि सर्वोच्च स्तरावर पदके जिंकल्यानंतर, तिची जगातील सर्वोत्तम बनण्याची इच्छा संपलेली दिसत होती. मात्र, मनूने हार मानली नाही.
2024 मध्ये रचला इतिहास
मनू भाकर ही पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतासाठी पहिली पदक जिंकणारी ऍथलीट ठरली आहे. तिने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकून भारताची मान उंचावली आहे. बाहेर पडण्यापूर्वी मनू रौप्यपदक जिंकणाऱ्या दक्षिण कोरियाच्या किम येजीपेक्षा केवळ 0.1 गुणांनी मागे होती. 22 वर्षीय मनू भाकरचे ऑलिम्पिकमधील हे पहिले पदक आहे. या स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्यपदक जिंकणारे दोन्ही खेळाडू दक्षिण कोरियाचे होते..