धक्कादायक! अर्धशतक हुकल्याच्या संतपातून फील्डरला जीवघेणी मारहाण
49 धावांवर कॅच आऊट केल्याच्या रागातून फील्डरच्या डोक्यात घातली बॅट
ग्वाल्हेर: क्रिकेट हा सर्वांचा आवडता खेळ. हा खेळ जिंकण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी बऱ्याचदा असते. त्यातून अनेकदा वादही झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पण क्रिकेटच्या मैदानात अमानुषतेचा कळस गाठणारी एक घटना घडली.
फलंदाजाचं अर्धशत हुकल्यानं रागात त्यानं फील्डरला बेदम मारहाण केली आहे. अमानुषपणे मारहाण करण्याचं कारणही अत्यंत शुल्लक होतं. फलंदाजाला 49 धावा झाल्यानंतर कॅच आऊट केल्यानं त्याच्या 50 धावा करायच्या राहुन गेल्या. अर्धशतक हुकल्याच्य़ा संतापातून त्याने फील्डिंग करणाऱ्या तरुणाला जीवघेणी मारहाण केली.
या प्रकरणाची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. अर्धशतक हुकल्याच्या रागातून जीवघेणी मारहाण करणाऱ्या या फलंदाजाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शहर पोलीस अधीक्षक रामनरेश पचौरी यांनी दिलेल्या माहितीनुसार 23 वर्षीय फील्डर सचिन पाराशरला गंभीर अवस्थेत सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. फलंदाज संजय पलिया या युवकावर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये शनिवारी गोरा मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात ही धक्कादायक घटना घडली. पचौरी यांनी दिलेल्या माहितीनुसार 49 धावांवर फील्डरनं कॅच पकडला तेव्हा आरोपी फलंदाज युवक खूप संतापला होता.
त्याला अर्धशतक पूर्ण करू न दिल्यानं त्याने बॅटनं फील्डरला बेदम मारहाण केली. इतर खेळाडूंनी आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला. सध्या आरोपी फरार असून त्याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.