सागर अव्हाड, पुणे झी  24 तास : कोरोनामुळे गेल्या 2 वर्षात सर्वच काही ठप्प झालं होत. जत्रा असो किंवा अनेक मोठ्या स्पर्धा रद्द कराव्या लागल्या होत्या. मात्र आता सर्व परिस्थिती नियंत्रणात आली आहे. त्यामुळे सर्वच काही पुन्हा पूर्वपदावर आलंय. आता कोरोना ओसरल्यानंतर राज्यातील प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. त्यामुळे कुस्तीपट्टू आणि कुस्तीप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्यामुळे आखाड्या-आखाड्यातील मल्लांनी शड्डू ठोकले आहेत. (maharshtra kesri kusti competition organised after 2 years 4 to 9th april at satara)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालक; दोन वर्ष ना जत्रा, ना यात्रा नाय झाला एखादा उरूस, मग कसा रंगला सांगा कुस्तीचा आखाडा.कोरोनामुळं सगळंच थांबलं त्यात आपली कुस्ती पण शांत. आता जरा  कोरोना अटोक्यात आलाय. सरकारनं बी नियम शिथिल केल्यात. मग आता कशाला माग सरायचं. ठोका शड्डू अन् उतरा मैदानात.



राज्य कुस्तीगीर परिषदेची बैठक झाली. एकमतानं कुस्त्या भरवण्याचं ठरलं. मैदानाचा ईचार झाला. म्हणलं पुन्हा सुरुवात हुतिया तर घ्यावा.  पैलवान स्व. खाशाबा जाधवांचा आशीर्वाद. म्हणून त्यांचाच जिल्हा म्हणजे सातारा ठरवला. 4 एप्रिल पासनं 9 एप्रिल तारीख ठरली.


पैलवानांच्या कसरती सुरु हाईत. नाद कुस्त्याचा हाय. मग माग सरायचं नाय. प्रतिस्पर्ध्याला चित पट करायचा डाव रंगतूय. प्रतिस्पर्धी चितपट होईल.पण यंदा जिंकल ती आपली लाडकी रांगडी कुस्ती.