मुंबई : जगातील सर्वोत्तम क्रिकेटरमध्ये महेंद्रसिंग धोनीचं नाव घेतलं जातं. 2008 पासून धोनीने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळण्यास सुरुवात केली. धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली 4 वेळा चेन्नईला विजेतेपद पटकावून दिलं आहे. मात्र यंदाच्या सिझनमध्ये चेन्नईला काही फार चांगली करता आलेली नाहीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान यावेळी चेन्नई सुपर किंग्जचा बॅटींग कोच मायकल हसीने धोनीनेबाबत एक मोठा खुलासा केला आहे. 2018 मध्ये धोनीने आयपीएलच्या सरुवातीला एक इमोशनल स्पीच दिलं होतं. यावेळी धोनीच्या डोळ्यात पाणी आल्याचंही, हसीने सांगितलं आहे. 


मॅथ्यू हेडनशी बोलताना मायकल हसीने सांगितलं की, मला वाटतं की, 2018 सिझन आमच्यासाठी खास होता. कारण आमच्यावर दोन वर्षांची बंदी होती. 


हसी पुढे म्हणाला की, जेव्हा आम्ही 2018 मध्ये पुन्हा आयपीएल सिझन खेळण्यासाठी आलो तेव्हा मला आठवतंय की, एमएस स्पीच देत होता. त्यावेळी माझ्याही मनात विचार आला की, हे काहीतरी खास असणार आहे. 


तो सिझन आमच्यासाठी खास आहे. हा विचार करून आमच्या अंगावर काटा येतो की, त्या वर्षी काय घडलं होतं. तो काळ आमच्यासाठी आयपीएलमध्ये कमबॅक केल्यासारखं वाटत होतं. त्या सिझनमध्ये धोनीने चांगला खेळ केला होता. ते आमच्यासाठी फास स्पेशल होतं, असंही हसीने सांगितलं आहे.