MS Dhoni : कोरोनामुळे आयपीएलचे सामने परदेशात खेळवण्यात आले होते. त्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींचा भ्रमनिरास झाला. आता कोरोना संकट आटोक्यात आल्याने देशांतर्गत स्पर्धा भारतातच होणार असल्याचं बीसीसीआयने (BCCI) सांगितलं आहे. त्यामुळे आता दुलीप ट्रॉफी आणि इराणी चषकानंतर आयपीएल (IPL 2023) देखील भारतात खेळवली जाण्याची शक्यता आहे.(Mahendra Singh Dhoni likely to retire in IPL 2023)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी IPL 2023 भारतात होणार असल्याचे संकेत दिले आहे. यंदा आयपीएल भारतात होणार असल्याने महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) चैन्नईच्या चिन्हास्वामी स्टेडियमवर पुन्हा आपल्या पिवळ्या जर्सीमध्ये दिसेल. त्यामुळे आता चैन्नईच्या फॅन्समध्ये (Chennai fans) आनंदाचं वातावरण आहे. 


मात्र, चैन्नईच्या फॅन्सच्या मनात काहीशी खंत देखील असणार आहे. त्याला कारण ठरतंय, धोनीने मागील वर्षी केलेलं एक वक्तव्य...


चेन्नईच्या पिवळ्या जर्सीमध्ये त्याची शेवटची वेळ असेल का?, असा सवाल धोनीला विचारण्यात आला होता. मी आयपीएल 2023 मध्ये परत येईल कारण मला चेन्नईतील त्याच्या चाहत्यांसाठी 'धन्यवाद' म्हणायचे आहे, असं धोनी म्हणाला होता. त्यामुळे IPL 2023 मध्ये धोनी खेळणार यावर शिक्कामोर्तब झालं होतं.


चेन्नईमध्ये चाहत्यांना धन्यवाद न म्हणता निवृत्ती घेणं योग्य ठरणार नाही, असं धोनी म्हणाला होता. त्यामुळे ज्यादिवशी चेन्नई संघाचा लीग स्टेजचा अखेरचा सामना असेल, त्यादिवशी धोनी निवृत्ती (Dhoni retirement) जाहीर करण्याची शक्यता आहे.


आम्हाला आशा आहे की, पुढच्या वर्षी आम्हाला वेगवेगळ्या शहरात फिरायला मिळेल आणि सर्वांना धन्यवाद म्हणता येईल, असंही धोनी म्हणाला होता. त्यामुळे यंदा धोनी निवृत्ती घेईल, हे जवळजवळ निश्चित मानलं जात आहे.


Definitely Not म्हणणाऱ्या धोनीने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतली होती. मात्र, आयपीएलमधून निवृत्ती घेताना धोनीने चाहत्यांना सेलिब्रेशनची संधी द्यावी, अशी इच्छा आता व्यक्त होताना दिसत आहे.