`कॅप्टन कूल` नव्हे, आता `कोच Cool`; माही होणार संघाचा कर्णधार?
Mahendra singh dhoni Rahul Dravid :येत्या काळात भारतीय क्रिकेट संघात काही मोठे बदल झाल्यास त्यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. गेल्या काही दिवसांपासून संघाची सातत्यपूर्ण निराशाजनक कामगिरी पाहता बीसीसीआय आता कठोर निर्णय घेणार
Mahendra singh dhoni Rahul Dravid : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC 2023) अंतिम सामन्यामध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी धुळ चारली आणि संघातील कर्णधारापासून अगदी प्रशिक्षकापर्यंत सर्वांनाच क्रिकेटप्रेमींनी निशाण्यावर घेतलं. यामध्ये सर्वाधिक टीका झाली ती म्हणजे संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी (Head Coach) असणाऱ्या राहुल द्रविडवर. द्रविडच्या प्रशिक्षकपदाला दोष देत अनेकांनी संघाच्या अपयशाचं खापर त्याच्या माथी फोडलं. इतकंच काय, तर काहींनी त्याला प्रशिक्षकपदावरून काढण्याची मागणीही केली.
द्रविडच्या विरोधात एकेएकी बळावलेला हा सूर आणि संघाची निराशाजनक कामगिरी पाहता आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय (BCCI) मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळत आहे. येत्या काळात हा निर्णय होऊ शकतो. जिथं बीसीसीआयच्या सचिवपदी असणाऱ्या जय शाह यांच्याकडून राहुल द्रविडला संघातून बाहेरचा रस्ता दाखवत त्याच्या जागी महेंद्रसिंह धोनीला मोठी संधी दिली जाऊ शकते.
कधी एकेकाळी संघाच्या कर्णधारपदी असणाऱ्या माहीला मिळणारी ही संधी संघासोबतच त्याच्यासाठीसुद्धा तितकीच महत्त्वाची ठरू शकते. थोडक्यात असं झाल्यास धोनी Cptain Cool नव्हे, Coach Cool असेल.
हेसुद्धा वाचा : रेल्वे प्रवासादरम्यान TTE तिकीट तपासायला आल्यास तुम्हाला माहित हवेत 'हे' नियम; हा तुमचा हक्क
भारतीय संघासाठी माहीचं प्रदर्शन आणि त्याच्या नेतृत्त्वाखाली संघाला मिळालेलं यश पाहता या अनुभवाचा वापर तो संघाच्या मुख्य प्रशिक्षपदी असताना करेल अशी आशा आतापासूनच अनेकांनी व्यक्त केली आहे. तेव्हा आता बीसीसीआय नेमका काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण क्रीडाजगताचं लक्ष लागून राहिलं आहे.
द्रविडच्या येण्यानं संघाला फायदाच नाही?
संयमी खेळीसाठी भारतीय संघातून नावारुपास आलेल्या राहुल द्रविडला प्रशिक्षकपदाची धुरा काहीशी सांभाळता आलेली नाही. त्याच्या कार्यकाळात संघानं आशिया चषक 2022, टी20 विश्वचषक 2022 आणि WTC 2023 अशा मोठ्या स्पर्धांमध्ये संघाचा दारुण पराभव झाला. ज्यामुळं द्रविडच्या प्रशिक्षण शैलीवरही अनेक प्रश्न उपस्थित झाले. याचाच फटका त्याला येत्या काळात बसू शकतो. द्रविडसोबतच संघाच्या कर्णधारपदी असणाऱ्या रोहित शर्मावर (Rohit Sharma) सध्या टांगती तलवार असून, कर्णधार म्हणून त्याच्या वाट्याला आलेल्या अपयशाचाही पाढा बीसीसीआय वाचेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळं आता हे बदलांचं सत्र संघात नेमकं केव्हा सुरु होईल याकडेच सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.