MS Dhoni Records in World Cup: जगातील महान विकेटकीपर बल्लेबाजांपैकी एक असलेल्या महेंद्रसिंग धोनीचा चाहता वर्ग मोठा आहे. टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये त्याची गणना होते. इतकेच नाही तर अनेक खेळाडूंसाठी तो एक आदर्श आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारताने इतिहास रचला आहे. असाच एक विक्रम त्याच्या नावावर आहे, जो या वेळेस T20 विश्वचषकातही मोडला जाणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महेंद्र सिंघचा11 वर्षे जुना रेकॉर्ड


धोनीच्या या विक्रमाबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात कमी सामन्यांसाठी आयसीसी (ICC) क्रमवारीत पहिले स्थान मिळवणारा धोनी पहिला फलंदाज आहे. पदार्पणानंतर अवघ्या 42 डावांमध्ये त्याने हे स्थान मिळवले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही एमएस धोनीच्या नावावर आहे. माहीने 2005 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 183 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळून हा विक्रम केला. यादरम्यान त्याने 15 चौकार आणि 10 षटकार ठोकले. 


तसेच एमएस धोनीच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्टंपिंगचा विक्रम आहे. त्याने 15 वर्षांच्या कारकिर्दीत 123 स्टंपिंग केले. त्याच्याशिवाय इतर कोणत्याही यष्टीरक्षकाने 100 चा आकडा गाठला नाही. भारतासाठी वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधार होण्याचा विक्रम महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आहे. धोनीने 2007 ते 2018 दरम्यान 200 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले.


सर्व आयसीसी ट्रॉफी जिंकणारा धोनी एकमेव कर्णधार 


माही आयसीसीच्या सर्व ट्रॉफी जिंकणारा जगातील एकमेव कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 टी -20 विश्वचषक, 2011 एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. धोनीचा हा विक्रम मोडणे जवळजवळ अशक्य आहे.   


कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने जिंकले


रांचीचा रहिवासी असलेल्या धोनीने टी-20 विश्वचषकात कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने जिंकले आहेत. या स्पर्धेत त्याने 33 सामन्यांमध्ये नेतृत्व केले आणि 20 जिंकले. या काळात टीम इंडियाला 11 सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. त्याच वेळी, एक सामना बरोबरीत संपला तर एकाचा निकाल लागला नाही. वेस्ट इंडिजचा डॅरेन सॅमी आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ 11-11 सामने जिंकून संयुक्त दुसऱ्या स्थानावर आहेत.


वाचा : PM Modi यांच्याकडून या सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट, 78 दिवसांचा बोनस मंजूर


टीम इंडियाचा महेंद्रसिंग धोनी (Mahendrasigh Dhoni) हा यशस्वी कर्णधार (Captain) आहे असं अनेकदा म्हटलं जातं. कारण त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारर्कीदीत त्याने अनेक मालिका जिंकल्या आहेत. त्याचबरोबर टीम इंडियाला त्याने टी 20 मधील विश्वचषक, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 50 ओव्हरमधील विश्वचषक जिंकून दिला आहे.