मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या टीमचा खेळ काही फार चांगला झालेला नाही. पॉईंट टेबलवर टीमची पोझिशन यंदा शेवटून तिसऱ्या आहे. अशा परिस्थितीत चेन्नईच्या टीमसाठी प्ले-ऑफचे दरवाजे जवळपास बंद आहेत. शिवाय रविंद्र जडेजानेही स्पर्धेच्या मध्येच कर्णधारपद सोडलं ज्यामुळे धोनीला पुन्हा ही धुरा स्विकारावी लागली. असं असतानाच आता धोनीला प्लेऑफमध्ये कसे पोहोचणार असा प्रश्न करण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या स्थितीला चेन्नईची टीम 11 सामन्यांमध्ये 4 सामने जिंकून 8 गुणांवर आहे. तर यानंतर आता चेन्नईचे पुढचे सामने हे मुंबई, हैदराबाद आणि लखनऊ यांच्याविरोधात आहेत. हे सर्व सामने जर चेन्नईने जिंकले तर त्यांचे 16 पॉईंट्स होतील आणि टीम प्लेऑफमध्ये एन्ट्री करू शकते.


दरम्यान याविषयी बोलताना महेंद्रसिंग धोनी म्हणाला की, मी गणित विषय फार काही आवडायचा नाही. मला शाळेतही त्याची आवड नव्हती. रनरेटचा विचार करून काही फायदा होत नाही. 


पुढच्या सामन्यात काय करायचं याचा विचार करायचा आहे. जर आम्ही प्लेऑफमध्ये पोहोचू शकलो तर उत्तमच आहे. पण आम्ही तसं नाही करू शकलो, तरीही जग काही संपत नाही, असंही धोनीने सांगितलं आहे.


आम्हाला मोठ्या धावांच्या फरकाने विजय मिळाला. पण हा विजय आधी मिळाला असता तर बरं झालं असतं अशी खंत धोनीनं व्यक्त केली. फलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. मला पहिली फिल्डिंग हवी होती. मात्र टॉस हरल्याने दुसरा पर्याय नव्हता.