मुंबई : विराट कोहलीच्या टीम RCB ने IPL 2021 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी मोठे बदल केले आहेत. अनेक खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर संघाला एक नवीन प्रशिक्षक देखील सापडला आहे. आरसीबीने श्रीलंकेच्या उजव्या हाताचा लेगस्पिनर वनिंदू हसरंगाला करारबद्ध केले आहे. त्याला ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज अॅडम झांपाऐवजी संघात स्थान देण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुश्मंथा चमीरा देखील आरसीबीच्या जर्सीमध्ये दिसणार आहे. त्याला ऑस्ट्रेलियाच्या केन रिचर्डसनच्या जागी संधी देण्यात आली आहे.


सिंगापूरमध्ये जन्मलेला टीम डेव्हिड देखील विराट कोहलीसोबत फलंदाजी करताना दिसणार आहे. त्याला न्यूझीलंडच्या फिन लेलनऐवजी संघात स्थान मिळाले आहे.


RCB चे बरेच खेळाडू IPL 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात दिसणार नाहीत. यामध्ये न्यूझीलंडचा(New Zealand) फिन एलन (Finn Allen) आणि स्कॉट कुग्गेलइज (Scott Kuggeleijn) यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाचे (Australia) केन रिचर्डसन (Kane Richardson), एडम झम्पा (Adam Zampa) आणि डेनियल सम्स (Daniel Sams) देखील आयपीएलसाठी यूएईला जाणार नाहीये. 


आयपीएल 2021 मध्ये आरसीबी टीममधील परदेशी खेळाडूंकडे


एबी डिव्हिलियर्स
ग्लेन मॅक्सवेल
वानिंदु हसरंगा
दुश्मंथा चमीरा
टिम डेविड
डेनियल क्रिश्चियन
काइल जेमिसन


प्रशिक्षक कॅटिच यांचा राजीनामा


सायमन कॅटिच यांनी वैयक्तिक कारणांमुळे RCB प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. आता माईक हेसन त्याची जागा घेतील. हेसन या संघात क्रिकेट ऑपरेशन्सचे संचालक आहेत, परंतु प्रशिक्षकाची अतिरिक्त जबाबदारीही ते सांभाळतील.