New Zealand vs Bangladesh : वनडे विश्वचषक 2023 चा 11 सामना (World Cup 2023) शुक्रवारी बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. या सामन्यात बांगलादेश संघाने न्यूझीलंड समोर 245 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना न्यूझीलंडने 7 ओव्हर शिल्लक असताना 246 धावांचं आव्हान पार केलं. यावेळी केन विलयम्सन (Kane Williamson) आणि डॅरिल मिशेल (Daryl Mitchell) यांनी अर्धशतकीय खेळी केली अन् न्यूझीलंडला वर्ल्ड कपमधील सलग तिसरा विजय मिळवून दिला आहे. किवींच्या या विजयानंतर आता वर्ल्ड कपच्या पॉईंट्स टेबलमध्ये (World Cup 2023 Points Table) अदलाबदल झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साऊथ अफ्रिकेने दोन दमदार विजयाच्या जोरावर 2.360 गुणांच्या जोरावर अव्वल स्थान मिळवलं होतं. साऊथ अफ्रिकेने दोन्ही सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. तर दुसरीक़डे न्यूझीलंडने देखील दोन सामन्यात दणक्यात विजय मिळवला होता. त्यामुळे अव्वल स्थानासाठी साऊथ अफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात चढाओढ दिसून येत होती. अशातच आता न्यूझीलंडने तिसरा विजय मिळवत 6 अंक कमावले आहेत. त्यामुळे न्यूझीलंडने अंकतालिकेत पहिला क्रमांक पटकावला आहे.  तर साऊथ अफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर घसरगुंडी झालीये. त्याचबरोबर तिसऱ्या स्थानी भारताचा क्रमांक आहे. 


पहिल्या दोन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला होता. त्यामुळे भारत 1.500 अंकासह तिसऱ्या स्थानी आहे. भारताबरोबर पाकिस्तानचे देखील 4 अंक आहेत. पाकिस्तान 0.927 सह चौथ्या स्थानी आहे. तर इंग्लंडचा संघ 1 विजय अन् एका पराभवासह पाचव्या स्थानी आहे. तर 3 सामन्यानंतर बांगलादेशच्या खात्यात 2 अंक जोडले गेले आहेत. वर्ल्ड कपचा दावेदार मानला जाणारा ऑस्ट्रेलिया यंदा अंकतालिकेच्या पायदळी असल्याचं दिसतंय. 


पाहा Points table



बांग्लादेश : तनजीद हसन, लिटन दास, नजमुल हुसेन शांतो, शकीब अल हसन (C), मेहदी हसन मिराज, मुशफिकुर रहीम (WK), तौहीद हृदोय, महमुदुल्लाह, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान.


न्यूझीलंड : डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (C), डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (WK), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.