मुंबई : गेल्या काही दिवसांपासून फुटबॉल जगतात मोठ्या घडामोडी घडत आहे. काही दिवसांपूर्वी लिओनल मेस्सीने बार्सिलोना संघ सोडत पॅरीसचा संघ जॉईन केला. तर आता मेस्सी पाठोपाठ प्रसिद्ध खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने देखील युव्हेंट्स (Juventus) संघाला रामराम ठोकला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्य म्हणजे रोनाल्डो युव्हेंट्स जुन्या क्लब मँचेस्टर युनायटेडमध्ये परतला आहे. क्लबनेच शुक्रवारी ट्विट करून याबाबत माहिती दिली. रोनाल्डो इटालियन क्लब युव्हेंटससोबत तीन वर्षे घालवल्यानंतर इंग्लिश प्रीमियर लीगमधील क्लबमध्ये परतला आहे. दरम्यान कालपर्यंत रोनाल्डो मँचेस्टर सिटीमध्ये जाऊ शकतो अशी चर्चा सुरु होती.


रोनाल्डो युव्हेंटसपूर्वी स्पेनच्या मोठा क्लब रियल माद्रिदकडून खेळत होता. रोनाल्डो 2009 मध्ये स्पॅनिश क्लबमध्ये पोहोचला आणि 2018 पर्यंत या क्लबमध्ये राहिला. त्याने या क्लबसह 'ला लीगा'ची विजेतेपदंही पटकावली आहेत. माद्रिदपूर्वी रोनाल्डो इंग्लिश प्रीमियर लीगचा भाग होता. 


2003 मध्ये मँचेस्टर युनायटेडसह त्याच्या प्रोफेशनल फुटबॉल कारकिर्दीची सुरुवात केली. तर आता पुन्हा एकदा तो या क्लबसाठी खेळताना दिसणार आहे. रोनाल्डोला पुन्हा एकदा मँचेस्टर युनायटेडमध्ये खेळताना पाहण्यासाठी त्याचे फॅन्स उत्सुक आहेत.


रोनाल्डो युव्हेंटस संघ सोडण्याच्या तयारीत असल्याचं युव्हेंटसचे प्रशिक्षक मॅसिमिलिआनो अलेग्री यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर रोनाल्डोचा समन्वयक जॉर्ज मेंडीसनेही या बातमीला दुजोरा दिला होता.