दुबई : पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये भारतीय बॉलरनी शानदार बॉलिंग केली आहे. पहिल्या 3 रनवरच पाकिस्तानच्या दोन विकेट गेल्यानंतर बाबर आझम आणि शोएब मलिकनं पाकिस्तानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांमध्ये 82 रनची पार्टनरशीप झाली. यावेळी 17.5 ओव्हरमध्ये बाबर आझमला बॉलिंग करत असताना हार्दिक पांड्याच्या पायात गोळा आला. त्यामुळे हार्दिक पांड्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर घेऊन जावं लागलं. हार्दिक पांड्याऐवजी मनिष पांडेला मैदानात फिल्डिंगसाठी बोलावण्यात आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनिष पांडेला फिल्डिंगसाठी मैदानात बोलावणं योग्य ठरलं. कारण त्यानं 24.5 ओव्हरला केदार जाधवच्या बॉलिंगवर सरफराज अहमदचा जबरदस्त कॅच पकडला. केदार जाधवनं टाकलेला बॉल सरफराजनं लाँग ऑनला खेळला पण बाऊंड्री लाईनवर उभ्या असलेल्या मनिष पांडेनं चपळाई दाखवत कॅच पकडला. बाऊंड्रीवर कॅच पकडत असताना मनिष पांडेचं संतुलन बिघडलं आणि तो बाऊंड्री लाईनच्या बाहेर लागला. त्यावेळी मनिष पांडेनं हातातला बॉल उडवला आणि मग बाऊंड्री लाईनच्या आत येत कॅच पुन्हा पकडला.



पुढच्या मॅचमध्ये मनिष पांडेला संधी


हार्दिक पांड्याला झालेली दुखापत किती गंभीर आहे हे अजून समजलेलं नाही. पण पुढच्या मॅचमध्ये हार्दिक पांड्या फिट झाला नाही तर त्याच्याऐवजी मनिष पांडेला संधी मिळू शकते.