मुंबई : आशियाई खेळांत पुरुष ८०० मीटर धावण्यात सुवर्ण पदक मिळवणाऱ्या मनजीत सिंह दीर्घकाळापासून नोकरी शोधण्याचा प्रयत्न करतोय. परंतु, या चिंतेसोबतच त्याची नजर लागलीय ती येत्या ऑलिम्पिककडे... मनजीतला कतारच्या दोहामध्ये होणाऱ्या पुढच्या वर्षीच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मेडल जिंकण्याचे वेध लागलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे मेडल जिंकल्यानंतर खेळाडू सरकारकडून एखाद्या नोकरीची किंवा बक्षीसाची अपेक्षा करतात... परंतु, मनजीत मात्र पुन्हा एकदा आपल्या खेळाकडे लक्ष केंद्रीत करतोय. २०१६ मध्ये नोकरी गमावल्यानंतर मनजीत सरकारकडून इतकीच अपेक्षा करतोय, की त्याला केवळ देशासाठी मेडल जिंकण्यासाठी मदत मिळेल. 


'२०१९ मध्ये होणाऱ्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप हेच माझं पुढचं लक्ष्य आहे. हे मेडल जिंकून ऑलिम्पिक (टोकियो २०२०) साठी क्वालिफाय करणं हे माझं ध्येय आहे. तिथूनच माझी ऑलिम्पिकसाठी तयारी सुरू होईल' असं मनजीतनं म्हटलंय. 


ओएनजीसीनं मार्च २०१६ मध्ये करार वाढवण्यास नकार दिल्यानंतर मनजीतकडे त्यानंतर आत्तापर्यंत कोणतीही नोकरी नाही. परंतु, याही परिस्थितीत मनजीतनं हार मानली नाही... कोच अमरिश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानं आपली ट्रेनिंग सुरू ठेवलीय.


आता मी आशियाई खेळांत गोल्ड मेडल जिंकलंय. माझ्या या यशासोबतच माझ्या अडचणींकडेही क्रीडा मंत्रालय लक्ष देईल, अशी आशा करतो. माझ्याकडे कोणतेही प्रायोजक नाहीत... ना मी कोणत्याही कंपनीकडून मदत घेतलीय. मंत्रालय मला टॉपमध्ये जागा 
देईल ज्यामुळे मला माझी ट्रेनिंग सुरू ठेवता येईल, अशी अपेक्षा करतो, असंही मनजीतनं म्हटलंय.