सेहवागला अपशब्द वापरणाऱ्या राशिद लतीफला मनोज तिवारीचं सडेतोड प्रत्युत्तर
भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागबद्दल अपशब्द वापरणाऱ्या पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक रशीद लतीफला मनोज तिवारीन सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागबद्दल अपशब्द वापरणाऱ्या पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक रशीद लतीफला मनोज तिवारीन सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. फेसबूकवर मनोज तिवारीनं एक व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये तिवारीनं रशीद लतीफला कडक शब्दांमध्ये ऐकवलं आहे.
भारताच्या महान क्रिकेटपटूविषयी बोलण्याची तुझी हिंमत कशी झाली. फक्त पब्लिसिटी मिळवण्यासाठी तू असं वक्तव्य केलं आहेस. सेहवागची रेकॉर्ड तपासण्यासाठी तुला इंग्रजी शिकावं लागेल, असं मनोज तिवारी म्हणाला आहे. पुन्हा जर असं वक्तव्य केलंस तर वेगळ्या भाषेत समजाववं लागेल, असा इशाराही मनोज तिवारीनं दिला आहे.
पाहा काय म्हणाला मनोज तिवारी
पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकल्यावर वीरेंद्र सेहवागनं बाप बाप होता है. नातवानंतर मुलाला हरवलं. पाकिस्तान १५ खेळाडूंना घेऊन मैदानात उतरला असता तरी जिंकला नसता, असं ट्विट सेहवागनं केलं होतं. यानंतर भडकलेल्या राशिद लतीफनं अत्यंत आक्षेपार्ह शब्दांमध्ये सेहवागवर टीका केली होती. तसंच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये भारताचा पराभव होईल अशी दुवाही लतीफनं मागितली होती.