Hardik Pandya Mantra Video : वर्ल्ड कपमधील (World Cup) सर्वात हायव्होलटेज सामन्याला सुरूवात झाली आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर दीड लाख प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा सामना खेळवला जातोय. टॉस पदरी पाडून टीम इंडियाने गोलंदाजीचा निर्णय घेतला पण पाकिस्ताने संयमी खेळीने सुरूवात केली. मात्र, भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानची टॉप ऑर्डर मोडून काढली. सुरूवातीच्या तीन विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला मोठी कसरत करावी लागली होती. मात्र, हार्दिक आणि सिराजने मारा सुरू ठेवला. पाकिस्तानच्या 13 व्या ओव्हरमधील हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानच्या डावाची सुरुवात अब्दुल्ला शफिक (Abdullah Shafique) आणि इमाम हुल हक (Imam-ul-Haq) यांनी केली. दोघांनीही सुरुवातीला 7 ओव्हर खेळून काढल्या. मोहम्मद शकीलच्या रुपात पाकिस्तानला पहिला धक्का बसला. त्यानंतर भारताने प्रेशर निर्माण करण्यास सुरूवात केली. 13 व्या ओव्हरमध्ये टीम इंडियाला विकेट्सची गरज होती. त्यावेळी रोहितने हार्दिक पांड्याच्या हातात ब़ॉल सोपवला. 13 व्या ओव्हरच्या तिसऱ्या सामन्यात हार्दिक बॉल तोंडासमोर घेऊन काहीतरी पुटपुटला. त्याच बॉलवर विकेट पडली अन् हार्दिकने अनोखं सेलिब्रेशन केलं.


पाहा Video



टीम इंडिया |  रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर.


पाकिस्तानचा संघ | बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद शकील, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), सऊद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन अफ्रिदी, हारिस रौफ.