मनू भाकरने KBC मध्ये म्हटला अमिताभ यांचा ढासू डायलॉग, ऐकून बिग बी ही थक्क Video
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला नेमबाजीत तब्बल 2 कांस्य पदक जिंकवून देणारी नेमबाज मनू भाकर आणि कुस्तीत कांस्य पदक जिंकणारा अमन सेहरावत हे टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध शो `कौन बनेगा करोडपती` मध्ये येणार आहेत.
Kaun Banega Crorepati : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला नेमबाजीत तब्बल 2 कांस्य पदक जिंकवून देणारी नेमबाज मनू भाकर आणि कुस्तीत कांस्य पदक जिंकणारा अमन सेहरावत हे टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध शो 'कौन बनेगा करोडपती' मध्ये येणार आहेत. या आठवड्यातील गुरुवारच्या भाग विशेष असणार असून यादरम्यान मनू आणि अमन हे ऑलिम्पिकमधील त्यांचा प्रवास प्रेक्षकांसोबत शेअर करणार आहेत.
5 सप्टेंबर रोजी कौन बनेगा करोडपती च्या विशेष भागाचे प्रसारण होणार असून या भागाचे प्रोमो सध्या समोर येऊ लागले आहेत. एका प्रोमोमध्ये ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर ही महानायक अमिताभ बच्चन यांचा डायलॉग म्हणताना दिसतेय. मनूने या शो दरम्यान नेमबाजीतील संपूर्ण 8 वर्षांचा प्रवास सांगितला. तिने म्हंटले की, "जेव्हा मी पोडियमवर मेडल घेण्यासाठी उभे होते तेव्हा 8 वर्षांचा संघर्षमय प्रवास माझ्या समोरून गेला". माझ्या आई वडिलांनी कुटुंबाने आणि प्रशिक्षकांची माझ्या या प्रवासात मोलाची भूमिका असल्याचे तिने म्हंटले. मनू भाकर हिने 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमासाठी पांढऱ्या फ्लोरल डिझाईनची साडी परिधान केली होती. मनूचा हा लूक तिच्या चाहत्यांना फार आवडता, या लूकमधील तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते.
मनूने म्हटला अमिताभ यांचा ढासू डायलॉग :
सध्या मनू आणि अमन सहभागी झालेल्या 'कौन बनेगा करोडपती' या भागातील एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात मनू भाकर हिने अमिताभ बच्चन यांचा ढासू डायलॉग म्हटला. मोहोब्बत्ते या चित्रपटातील अमिताभ यांचा " परंपरा, प्रतिष्ठा और अनुशासन. ये गुरुकुल के तीन स्तंभ हैं। ये वो आदर्श हैं जिनसे हम आपका आने वाला कल बनाते हैं।" मनूने हा डायलॉग म्हणताच बिग बी सुद्धा थक्क झाले.
मनू भाकर कोण आहे?
हरियाणामधी झज्जर येथे मनू भाकर हिचा जन्म झाला. शाळेत असल्यापासूनच तिला खेळाची आवड होती. वयाच्या 14 व्या वर्षी मनू हिन नेमबाजीमध्ये आपले करियर करण्याचा निर्णय घेतला. वडिलांना पिस्तुल खरेदी करण्यास सांगितले. त्यानंतर मुलीच्या स्वप्नांना पाठिंबा देणाऱ्या तिच्या वडिलांनी पिस्तुल विकत घेऊन दिली होती, आज त्याच मनू भाकरने भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकांचं खातं उघडलं आहे. मनू भाकर हिने महिलांच्या १० मी पिस्तूल प्रकारात कांस्य पदक जिंकले. तर सरबजोत सिंह सोबत शूटिंगच्या 10 मी एअर पिस्तूल मिश्रित प्रकारात तिने पुन्हा एकदा भरला कांस्य पदक मिळवून दिले. एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत तब्बल दोन पदक जिंकणारी मनू ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली.