पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं खातं उघडलं, Manu Bhaker ची कांस्यपदकाला गवसणी
Olympic Games Paris 2024 : भारताची नेमबाजपट्टू मनू भाकर हिने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल नेमबाजीत कांस्यपदकाला (Manu Bhaker Wins bronze) गवासणी घातली आहे.
Manu Bhaker Win bronze : मनू भाकरने 10 मीटर पिस्तुल नेमबाजीत कांस्यपदक जिंकले, नेमबाजीत भारताची पहिली महिला ऑलिम्पिक पदक विजेती ठरली. 2004 मध्ये सुमा शिरूरनंतर वैयक्तिक स्पर्धेत ऑलिम्पिक नेमबाजीच्या अंतिम फेरीत पोहोचणारी 20 वर्षांतील पहिली भारतीय महिला ठरली. अटीतटीच्या लढतीत मनू भाकरने 221.7 गुणांसह कांस्यपदक मिळवलं.
मनू भाकरने 10 मीटर्स एअर पिस्टल नेमबाजीच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. 22 वर्षांची मून भाकर ही मूळची हरियाणातल्या झज्जर तालुक्याची आहे. मनू भाकरने आपल्या नेमबाजी करिअरमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही तिने आपला ठसा उमटवलेला आहे. अशातच आता ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्याने मनू भाकरने सर्वांची मनं जिंकली आहे. 2021 मध्ये टोकियो ऑलिम्पिकमधील पात्रतेमध्ये पिस्तुलमधील बिघाडानंतर मनू स्पर्धेतून बाहेर पडली होती.
काय म्हणाली मनू भाकर?
पदक जिंकल्यानंतर मनू भाकर बोलताना म्हणाली, ही फार वेगळी भावना आहे, जी मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. पदक जिंकल्याचा मला प्रचंड आनंद आहे. हे पदक माझ्या एकटीचं नसून ही टीमची मेहनत आहे. मला या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेल्या भारतीयांचे मी आभार मानते. हे भारताचं पहिलं पदक आहे आणि भारत या ऑलिम्पिकमध्ये अजून पदकांची कमाई करेल याची मला खात्री आहे.
दरम्यान, पाच शॉट्सच्या पहिल्या राउंडला 50.4 शूट करून दुसरे स्थान पटकावलं. मात्र दुसर्या राउंडमध्ये तिने प्रत्येकी 5 शॉट्सच्या दोन मालिकेनंतर एकूण 100.3 अंक मिळवले. त्यानंतर अखेरपर्यंत तिने झुंज दिली अन् पहिल्या तिन्ही स्थानावर आपली पकड मजबूत केली. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण, मनू भाकरचं रौप्यपदक केवळ 0.1 पॉईंटने हुकलं.