Mark Boucher On Mumbai Indians Captaincy : मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आयपीएल 2024 साठी हार्दिक पांड्याचं (Hardik Pandya) नाव कर्णधार म्हणून जाहीर केलं आहे. आयपीएल ऑक्शनपूर्वी मुंबईने याबाबतची घोषणा केली होती. गुजरात टायटन्सकडून मुंबई इंडियन्समध्ये परतलेल्या हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपवण्यात आल्याने क्रिडाविश्वात अनेक मोठमोठ्या चर्चा झाल्या होत्या. हार्दिकला कॅप्टन्सी देताच रोहित शर्माच्या (Rohit Sharma) चाहत्यांनी नाकं मुरडली आहेत. अशातच रोहित शर्माला नारळ देऊन हार्दिकला कॅप्टन का केलं? यावर मुंबइ इंडियन्सचे हेड कोच मार्क बाउचर (Mark Boucher) यांनी उत्तर दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाले Mark Boucher?


रोहित शर्माने आपल्या फलंदाजीचा आनंद घ्यावा अन् मुंबईला मोठ्या उंचीवर पोहोचवावं, यासाठी त्याच्याकडून कॅप्टन्सी काढण्यात आली, असं हेड कोच मार्क बाउचरने यांनी म्हटलं आहे. माझ्या मतानुसार हा निर्णय पूर्णपणे क्रिकेटशी संबंधीत निर्णय आहे. बाकी काहीही नाही... हार्दिक पांड्याला आम्ही संघात घेण्याचा असा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. अनेक लोकांना याबद्दल माहिती देखील नव्हतं. त्यामुळे लोक भावनिक होतात. काही वेळेस काही निर्णय घेताना आपल्याला भावना दूर ठेवाव्या लागतात, असं मत कोच मार्क बाउचरने मांडलंय.


एक खेळाडू म्हणून रोहित शर्मा नक्कीच ग्रेट आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये खूप चांगली कामगिरी केलीये. त्याला आपल्या कारकिर्दीत अनेक सामने अजून खेळायचे आहेत. आम्हाला वाटतं की त्याने आपल्या फलंदाजीचा आनंद घेतला पाहिजे. त्याला चांगल्या धावा येत्या काळात करायच्या आहेत, असं कोच मार्क बाउचर यांनी म्हटलंय.


टीम इंडियाचं त्याच्याकडे कर्णधारपद असल्याने त्याच्यावर मोठी जबाबदारी आहे. पण आयपीएलमध्ये खेळेल तेव्हा त्याच्या खांद्यावर ही जबाबदारी नसेल, त्यामुळे तो फ्री होऊन खेळू शकतो. येत्या काळात तो उत्तम फलंदाजीसाठी तयार असले आणि मी त्याला मुंबई इंडियन्ससाठी आनंदाने खेळताना पाहू शकतो, असा विश्वास देखील मार्क बाउचर यांनी व्यक्त केलाय.


मुंबई इंडियन्सचा संघ


मुंबई इंडियन्स : आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, हार्दिक पांड्या (C), डेवाल्ड ब्रेविस, इशान किशन (WK), जेसन बेहरेनडॉर्फ, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय सिंग, एन. तिलक वर्मा, नेहल वढेरा, पियुष चावला, रोहित शर्मा, रोमॅरियो शेफर्ड, शम्स मुलानी, सूर्यकुमार यादव , टीम डेव्हिड आणि विष्णू विनोद.


नवे खेळाडू : जेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी आणि शिवालिक.