Marnus Labuschagne : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळवण्यात येतेय. या सिरीजमधील तिसरा सामना इंदूरमध्ये खेलवला जात असून टीम इंडिया (Team India) पराभवाच्या छायेत आहे. कारण ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी केवळ 76 रन्सची गरज आहे. अशात परिस्थितीत तिसऱ्या सामन्यातील दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया फिल्डींग करत असताना मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) चा एक व्हिडीओ व्हायरल झालेला दिसतोय. यामध्ये लाबुशेन त्याच्या ओठांना काहीतरी लावतोय असं दिसतोय.


लाईव्ह सामन्यात Marnus Labuschagne ने लावली लिपस्टिक?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिसर्‍या सामन्यात ऑस्ट्रेलियन टीमने मजबूत पकड निर्माण केली असून चेतेश्वर पुजारा हा एकमेव फलंदाजाने उत्तम खेळ केला. आजच्या सामन्यातील एक व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडिओमध्ये, ऑस्ट्रेलियन टीमचा टॉप ऑर्डर बॅट्समन मार्नस लॅबुशेन टीम इंडियाच्या 27 व्या ओव्हरनंतर ओठांना काहीतरी लावताना कॅमेऱ्यात कैद झाला. यावेळी चाहत्यांनी लाबुशेन लिपस्टिक लावत असल्याचं म्हटलं आहे. 


तुम्ही हा व्हिडीओ पाहिलात तर तुम्हाला दिसेल, ऑनफिल्ड अंपायरशी बोलत असताना खिशातून लिप बाम काढून ओठांवर लावतोय. हे पाहून भारतीय चाहत्यांना मैदानात हसू आवरलं नाही. इतकंच नाही तर लॅबुशेनचं हे कृत्य पाहून ऑनफिल्ड अंपायर नितीन मेनन यांनाही हसू आवरता आलेलं नाही.



दुसऱ्या डावात टीम इंडियासाठी कर्दनकाळ बनला नॅथन लिऑन 


तिसऱ्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच्या लंच ब्रेकपूर्वी टीम इंडियाने (IND vs AUS) दुसऱ्या डावाच्या खेळाला सुरुवात केली होती. यावेळी लंचपर्यंत 13 नाबाद असा स्कोर भारताचा होता. मात्र लंचनंतर टीम इंडियाचा खेळ काही चांगला झालेला दिसला नाही. चहापानापर्यंत टीम इंडियाने महत्त्वाचे विकेट्स गमावले होते. या सेशनमध्ये कांगारूंचा स्पिनर लिऑन भारतासाठी भारी पडला. लिऑनने कर्णधार रोहित शर्मा (12) शुभमन गिल (5) आणि रवींद्र जडेजा (7) हे महत्त्वाचे विकेट्स पटकावले होते. यावेळी तिसऱ्या नंबरवर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या चेतेश्वर पुजाराने एका बाजूने भारताचा मोर्चा सांभाळून धरला. त्याने शानदार अर्धशतक झळकावत 59 रन्सची खेळी केली.


इंदूरच्या मैदानावर पुन्हा एकदा लिऑन नावाचं वादळ आलं आणि भरत (3), अश्विन (16) आणि उमेश (0) यांची विकेट घेत टीम इंडियाला कमकुवत केलं. याशिवाय त्याने एका बाजूला डटून उभा असलेल्या चेतेश्वर पुजाराचाही काट काढला. नॅथनच्या गोलंदाजीवर स्टिव्ह स्मिथकडे कॅच देऊन 59 रन्सवर पुजारा पव्हेलियनमध्ये परतला. यानंतर यादवनंतर मोहम्मद सिराजला बोल्ड करत 8 विकेट्स घेण्यात यशस्वी झाला.


ऑस्ट्रेलियाला 76 रन्सचं आव्हान


टीम इंडियाचा दुसरा डावंही गडगडला. दुसऱ्या डावात 163 रन्सवर टीम इंडिया ऑल आऊट झाली. यावेळी टीम इंडिया 75 रन्सची आघाडी घेतली असून कांगारूंना तिसरी टेस्ट जिंकण्यासाठी 76 रन्सचं आव्हान मिळालं आहे. टीम इंडियाकडून दुसऱ्या डावामध्ये चेतेश्वर पुजाराची बॅट केवळ तळपली. पुजाराने शानदार हाफ सेंच्युरी झळकावत 59 रन्सची खेळी केली.