मुंबई : टी20 क्रिकेटला आता मोठा बादशाह मिळाला आहे. टी20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत रोहीत शर्मा (Rohit Sharma) हा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. मात्र त्याचा सर्वांधिक धावा करण्याचा विक्रम आता एका खेळाडूने मोडला आहे. त्यामुळे आता सर्वांधिक धावा करण्याच्या क्रमवारीत टॉपवर आता एका नवा खेळाडू आला आहे. हा खेळाडू कोण आहे ते जाणून घेऊयात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहितचा रेकॉर्ड ब्रेक
न्यूझीलंडचा सलामीचा फलंदाज मार्टिन गुप्टिलने (Martin guptill) रोहित शर्माचा (Rohit Sharma) टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मोठा विश्वविक्रम मोडला आहे. मार्टिन गुप्टिलने रोहित शर्मासारख्या धोकादायक फलंदाजाला मागे टाकून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा धक्का दिला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात मार्टिन गुप्टिलने (Martin guptill) हा पराक्रम केला आहे. 35 वर्षीय गुप्टिलने 13 चेंडूत 15 धावा केल्या आणि यादरम्यान त्याने रोहित शर्माला मागे टाकत नवा विश्वविक्रम केला. आता तो  T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. 


T20त सर्वाधिक धावा 
मार्टिन गुप्टिलने (Martin guptill) आतापर्यंत 121 सामने खेळले असून त्यात त्याच्या नावावर 3497 धावा आहेत. या बाबतीत रोहित शर्माही त्याच्यापेक्षा जास्त मागे नाही, रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3487 धावा आहेत. त्यापाठोपाठ भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (3308 धावा), आयर्लंडचा एकदिवसीय कर्णधार पॉल स्टर्लिंग (2975 धावा) आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंच (2855 धावा) यांचा क्रमांक लागतो. कोहली 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 3000 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला.


दरम्यान रोहित आणि मार्टीन गुप्टिलने (Martin guptill) या दोघांच्या धावात फार फार तर 10 ते 15 धावांचा फरक आहे. त्यामुळे मार्टीन किती काळ टी20 त नंबर वन राहतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.