`तुम्ही सज्जन नाही, ज्या गोष्टीवर जगाने 30 वर्षांपूर्वी...`; भारतीय अभिनेत्रीने रमीझ राजाला झापलं
Actress Slams Ramiz Raja: 1980 च्या दशकामध्ये सध्या बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचं या तत्कालीन कर्णधाराशी सूत जुळलं आणि ती लग्नाआधीच प्रेगनंट राहिली. तिने एका मुलीला जन्म दिला.
Actress Slams Ramiz Raja: फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री मसाबा गुप्ताने बुधवारी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष राहिलेल्या रमीझ राजा यांना चांगलेच फैलावर घेतलं आहे. मसाबाच्या पालकांबद्दल वर्णद्वेषी भाष्य करण्यात आल्यानंतर रमीझ राजा हे हसत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज क्रिकटपटू विवियन रिचर्ड्स आणि ज्येष्ठ अभिनेत्री निना गुप्ता यांच्याबद्दल बोलताना वर्णद्वेषी टीप्पणी पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनीवरील क्रिकेटसंदर्भातील कार्यक्रमात चर्चा करण्यात आली. हा संपूर्ण प्रकार 2 महिन्यांपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामधील होती. मात्र त्याचा व्हिडीओ आता व्हायरल झाल्यानंतर मसाबाने रमीज राजाला झापलं.
व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय?
रमीझ राजा ज्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. त्यामध्ये एका महिलेने विवियन रिचर्ड्ससारखी व्यक्ती निना गुप्ताला डेट करत असल्याचं पाहून माझं मन खिन्न झालं असं म्हटलं. यासंदर्भात तिने एक वर्णद्वेषी टीका करणारी शायरीही यमक जुळवून म्हटली. ही वर्णद्वेषी टीका ऐकून रमीझ राजा मोठ मोठ्यानं हसू लागले.
मसाबाने राजा यांना झापलं
मसाबाने यावरुनच रमीझ राजा यांना झापलं आहे. "प्रिय रमीझ राजा (सर) सज्जनपणा हा गुण फार कमी लोकांकडे असतो. माझे आई-वडील आणि माझ्याकडे हा गुणधर्म आहे. तुमच्याकडे तो नाही. ज्या गोष्टीवर जगाने 30 वर्षांपूर्वीच हसणं थांबवलं आहे त्यावर तुम्हाला पाकिस्तानमधील राष्ट्रीय वाहिनीवर हसताना पाहून फार त्रास झाला. भविष्याकडे निघा. आम्ही तिघे इथेच (भविष्यात) आहोत अगदी ताट मानेनं उभे आहोत," अशी पोस्ट मिसबाने ट्वीटरवरुन केली आहे. तिने रमीझ राजा हा हॅशटॅगही वापरला आहे. हा व्हिडीओ आता व्हायरल झाला असून हा व्हिडीओ आशिया चषक स्पर्धेदरम्यानच्या कार्यक्रमातील आहे. 12 सप्टेंबर 2023 रोजी हा कार्यक्रम प्रसारीत झाला होता.
नीना गुप्ता आणि विवियन रिचर्ड्स यांची लव्हस्टोरी
नीना गुप्ता आणि विवियन रिचर्ड्स या दोघांमधील प्रेम प्रकरण 1980 च्या दशकाच्या शेवटी सुरु झालं. वेस्ट इंडिजचे तत्कालीन कर्णधार रिचर्ड्स यांच्या नेतृत्वाखाली संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. रिचर्ड्स त्यावेळेस भारतीय महिलांमध्ये चांगलेच लोकप्रिय होते. त्यावेळी रिचर्ड्स हे विवाहित होते. ते त्यांच्या पत्नीपासून विभक्त होण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरु होती. मुंबईमधील एक पार्टीमध्ये रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांची भेट झाली. दोघांमध्ये असा कोणताही समान धागा नव्हता. तरी या दोघांमध्ये संवाद सुरु झाला. त्यातून ते प्रेमात पडले आणि नंतर नीना गुप्ता या रिचर्ड्स यांच्यापासून गरोदर राहिल्या. मात्र नीना गुप्ता आणि रिचर्ड्स यांचं लग्न होणं शक्य नव्हतं.
नीना निर्णयावर ठाम राहिल्या
नीना गुप्तांचं कुटुंब हे रुढीवादी होतं. त्यामुळे लग्नाशिवाय मुलाचा विचार करणं त्यावेळेस शक्य नव्हते. मात्र नीना गुप्ता यांनी बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. सिंगल मदर होण्याचा निर्णय नीना यांनी त्या काळात घेतला हे त्यावेळी फारच आव्हानात्मक होतं. मात्र नीना या त्यांच्या निर्णयावर ठाम राहिल्या आणि त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. ही मुलगी म्हणजे मसाबा होय.