नवी दिल्ली :  जगातील अनेक मोठ्या व्यक्तींना भारताबद्दल आत्मियता वाटते त्यात एक नाव आहे ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज मॅथ्यू हेडन...  मॅथ्यू हेडनने मंगळवारी भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमिन्त एक ट्विट केले. त्यामुळे त्यांच्याबद्दल सर्व भारतीयांच्या मनात आदर वाढला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याच्या एका ट्विटमुळे हे सिद्ध झाले की त्याच्या मना भारत आणि भारतवासियांबद्दल असीम प्रेम आहे. अनेकांनी भारताला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या पण मॅथ्यू हेडनचा अंदाज काही औरच होता. 


त्यान ट्विट करताना भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच याबरोबर एक फोटो शेअर केला. ज्यात लिहिले की, सगळ्यांच्या मनावर अधिराज्य करणारा भारतातील आहे. ज्याचे नाव पंजाब, सिंध, गुजरात मराठा, द्रविड, ओडिशा आणि बंगालच्या हृदयात आहे. ज्याचे नाव हिमालयांच्या पर्वत रांगेत घुमते. ज्याचे नाव गंगा-यमुना नद्यांच्या पाण्यात वाहते. हिंद महासागरांच्या लाट ज्याच्या नावाचा जप करतात. तो तुम्हांला आशीर्वाद दे आणि तुमची रक्षा करो. तो तुम्हांला खूश ठेवो आणि त्याची दया तुमच्यावर कायम राहो. तो शांती देवो, आता आणि कायमसाठी... आमीन... 


 



मॅथ्यूच्या या ट्विटने साबित केले की त्याला राष्ट्रगीत समजत नसेल तरी त्याचे भाव त्याला माहिती आहे. त्याने असे ट्विट केल्याने अनेक जण खूश झाले. त्याच्या या ट्विटला १३०० जणांनी रिट्विट केले आहे. तर ५ हजार लोकांनी लाइक केले आहे. 


हेडन अनेकदा भारतीयांना सणांनिमित्त शुभेच्छा देत असतो.