Mayank Agarwal welcomes baby boy : बांगलादेश विरूद्धची शेवटची वनडे मॅच टीम इंडियाने (Team India) 227 धावांनी जिंकली. टीम इंडियाने ही मालिका गमावली असली तरी या विजयाची चर्चा आहे. त्यात आता टीम इंडियाचा स्टार खेळाडूला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. या खेळाडूने सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा स्टार फलंदाज मयंक अग्रवाल (mayank agarwal) याच्या घरी चिमुकल्या पावलांचे आगमन झाले आहे. मयंक अग्रवालच्या बायकोने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. यामुळे मयंक अग्रवाल आता वडिल बनला आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या (Team India) चाहत्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे.  


पोस्टमध्ये काय?


मयंक अग्रवालने (mayank agarwal) मुलगा झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने मुलाचेही नाव उघड केले आहे. 


मयंक अग्रवालने (mayank agarwal) त्याच्या ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मयंक पत्नी आणि मुलासोबत दिसत आहे. त्याने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'आम्ही कृतज्ञतेने भरलेले आहोत आणि आम्ही अयांशला तुमच्याकडे घेऊन येत आहोत. प्रकाशाचा पहिला किरण, आमचा वाटा आणि देवाची देणगी.. असे त्याने लिहले आहे. 


मयंकच्या  (mayank agarwal) मुलाचा जन्म 8 डिसेंबरला झाल्याची माहिती आहे.त्यानंतर आता तीन दिवसांनी पोस्ट टाकून त्याने याबाबतची माहिती दिली आहे.  



मैत्रिणीशी केलं लग्न


मयंक अग्रवालने (mayank agarwal) जून 2018 मध्ये त्याची मैत्रिण आशिता सूदशी लग्न केले होते. आशिता या व्यवसायाने वकील आहेत. दोघेही शालेय जीवनापासून मित्र होते आणि हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. आशिताचे वडील प्रवीण सूद सध्या कर्नाटकचे डीजीपी आहेत.


दरम्यान सध्या मयंक  (mayank agarwal) टीम इंडियाच्या (Team India)  बाहेर आहे. आयपीएल 2023 च्या मिनी लिलावापूर्वी पंजाब किंग्सने त्याला सोडले आहे. त्याने त्याची मूळ किंमत एक कोटी रुपये ठेवली आहे. आयपीएल 2022 च्या आधी, पंजाब किंग्जने त्याला 14 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते, परंतु यावर्षी होणाऱ्या मिनी लिलावापूर्वी त्याला सोडले आहे. त्यामुळे आता त्याला कोणत्या संघात स्थान मिळते हे पाहावे लागेल.