मुंबई : दिल्ली टीमवर कोरोनाचं संकट असतानाही मनोबल न ढासळू देता धैर्यानं टीमने सामना खेळला. मनोबल काय असतं आणि ठरवलं तर काय होऊ शकतं हे दिल्ली टीमने दाखवून दिलं. पंजाबला 9 विकेट्सनं पराभूत केलं आहे. त्यांच्या या विजयाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तर पंजाबला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अत्यंत वाईट फ्लॉप शोनंतर पंजाबच्या फलंदाजांवर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आलं. मात्र तसं असताना कॅप्टन मयंक अग्रवालनं केलेलं विधान धक्कादायक होतं. त्याने पराभवाचं खापर सरळ बॉलर्सच्या डोक्यावर फोडलं. 


पंजाब टीम 115 धावा करून तंबुत परतली. हातून सामना गेल्यानंतर मयंक अग्रवाल खूप जास्त संतापला. खराब बॉलिंगमुळे पराभव मिळाल्याचा दावा अग्रवालनं केला. 


आम्ही नीट गोलंदाजी करू शकलो  ना फलंदाजी या सामन्यात जे घडलं ते विसरणं गरजेचं आहे. या गोष्टीवर मी जास्त बोलू इच्छीत नाही असंही मयंक अग्रवाल म्हणाला. 


ऋषभ पंतने 3 स्पिनर्सच्या मदतीने पंजाबची अख्खी टीम उद्ध्वस्त करून तंबुत धाडली. कोरोनाचं सावट आणि टेन्शन असतानाही पंतने धरलेला संयम आणि टीमने दाखवलेलं कौशल्य वाखाणण्याजोगं आहे.