मुंबई: कर्नाटकचा सलामीवीर मयांक अग्रवालने गेल्या वर्षी स्थानिक स्तरावर आपल्या फलंदाजीने धमाल उडवून दिली होती. स्थानिक स्तरावर त्याने इतके रेकॉर्ड केले की  त्याने सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली सारख्या दिग्गजांना मागे टाकले. दरम्यान या फलंदाजांला अद्याप भारतीय संघात जागा मिळवता आलेली नाहीये. मात्र इंग्लंड दौऱ्यासाठी इंडिया ए संघात त्याची निवड झालीये. इंग्लंड दौऱ्याआधी मयांक अग्रवाल आपली गर्लफ्रेंडसोबत लग्नबंधनात अडकलाय. आयपीएल २०१८मध्ये मयांक अग्रवाल पंजाबकडून खेळला होताय. मयांक त्याची गर्लफ्रेंड अशिता सूद हिच्याशी विवाहबद्ध झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मयांक आणि अशिता यांच्या लग्नाला कर्नाटकचा फलंदाज लोकेश राहुल उपस्थित होता. लोकेश राहुलने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर मयांकच्या लग्नाचे काही फोटो शेअर केलेत. मयांकने त्याच्या गर्लफ्रेंडला लंडनमध्ये प्रपोज केले होते.