पंजाबचं बल्ले बल्ले! या खेळाडू ठरला विजयाचा खरा हिरो; कॅप्टन अग्रवालकडून कौतुक
पंजाबच्या विजयानंतर कॅप्टन मयंक अग्रवालचं मोठं विधान
मुंबई : आयपीएलमधील 23 वा सामना पंजाब विरुद्ध मुंबई झाला. या सामन्यात पंजाबने 12 धावांनी मुंबईवर विजय मिळवला आहे. मुंबईचा पाचवा पराभव आहे. पंजाबने विजयानंतर बल्ले केलं. कर्णधार मयंक अग्रवालने विजयाचा खरा हिरो कोण ते सांगितलं. याशिवाय त्याने टीममधील खेळाडूंचं कौतुक केलं.
आमच्यासाठी ही एक सुंदर रात्र होती. विजयामध्ये योगदान देऊन खूप आनंद झाला आहे. सामन्यात अनेक चढाव-उतार आले. आमच्यासाठी प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. आम्ही खूप हुशारीने खेळत होतो. कुठेही चुक होणार नाही आणि हातून सामना निसटणार नाही याची खबरदारी आम्ही घेतली.
आम्ही आधीच सावध होतो. मागच्या सामन्यातील चुका टाळण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला. या विजयाचं श्रेय ब्रेविसला जातं. त्याने राहुलचा सामना केला. त्या ओव्हर्स आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या होत्या.
टिळक आणि ब्रेविस आऊट झाले तेव्हा आम्ही आमची रणनिती बदलली. पंजाबचा हा तिसरा विजय आहे. तिसऱ्या विजयाचा आम्हाला खूप आनंद असल्याचं कर्णधार मयंक अग्रवालनं म्हटलं आहे.
पंजाबने पॉईंट टेबलवरही उसळी मारली आहे. 5 पैकी 2 सामने गमवले तर 3 जिंकले असून पंजाब टीम तिसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर राजस्थान आणि दुसऱ्या स्थानावर कोलकाता आहे.