IND VS BAN T20 Series Mayank Yadav : भारत विरुद्ध बांगलादेश टेस्ट सीरिजनंतर 6 ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या टी 20 सीरिजसाठी सुद्धा  टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. 6 आणि 9 ऑक्टोबर रोजी भारत बांगलादेश यांच्यात टी 20 सीरिज खेळवली जाणार असून यासाठी टीम इंडियात आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जाएंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादव याला प्रथमच संधी देण्यात आली आहे. आयपीएल 2024 मध्ये मयंकने 156. 7 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने गोलंदाजी केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मयंक यादवने आयपीएलच्या 17 व्या सीजनमध्ये पदार्पण केले होते. यावेळी लखनऊ सुपर जाएंट्सकडून खेळणाऱ्या 22 वर्षीय मयंकने 156. 7 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने गोलंदाजी करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्याने पहिल्याच सामन्यात पंजाब विरुद्ध गोलंदाजी करताना लागोपाठ 150 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने गोलंदाजी टाकून फलंदाजांना घाम फोडला. यावेळी मयंकने पंजाबच्या जॉनी बेयरस्टो, प्रभसिमरन सिंह आणि जितेश शर्मा याना आउट केले होते. आयपीएलमध्ये खेळलेल्या पहिल्याच सामन्यात त्याला प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड मिळाला होता. 


आरसीबी विरुद्ध केली होती 156.7 kmph च्या वेगाने गोलंदाजी : 


मयंकने आयपीएल 2024 मध्ये पंजाब विरुद्ध सामन्यातून पदार्पण केले. यावेळी त्याने पहिल्याच सामन्यात 27 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या होत्या. पंजाब विरुद्ध पहिल्या सामन्यात 155.8 kmph ने गोलंदाजी तर आरसीबी विरुद्ध 156.7 kmph च्या वेगाने त्याने गोलंदाजी केली होती आणि स्वतःचाच रेकॉर्ड मोडला.  या कामगिरीमुळे मयंक एका रात्रीतच स्टार बनला. त्याने सुरुवातीच्या दोन सामन्यात तब्बल 6 विकेट्स आपल्या नावे केले आणि लागोपाठ दोन्ही सामन्यात त्याने प्लेअर प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड जिंकला. 


हेही वाचा : बीसीसीआयची मोठी घोषणा! IPL च्या प्रत्येक मॅचसाठी खेळाडूंना मिळणार वनडेपेक्षाही जास्त मॅच फी


 


मयंक यादवची डोमेस्टिक क्रिकेट कारकीर्द : 


मयंक यादवने एका फर्स्ट क्लास सामन्यात 2 विकेट घेतले आहेत. तर लिस्ट ए च्या 17 सामन्यात त्याने 34 विकेट घेतले. 17 जून 2002 ला नवी दिल्ली येथे जन्मलेल्या मयंकने टी 20 सामन्यात 19 विकेट घेतले आहेत. मयंक यादवने आयपीएल 2024 मध्ये एकूण 4 सामने खेळेल मात्र दुखापतीच्या कारणामुळे याला उर्वरित सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. आयपीएलच्या 4 सामन्यात त्याने एकूण 7 विकेट्स घेतल्या. 


बांगलादेशविरुद्ध टी 20 सीरिजसाठी भारतीय संघ : 


सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा, अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि मयंक यादव.