जिम्नॅस्टिक खेळाडूचा टीमच्या डॉक्टरवर आरोप, अनेकदा केला लैंगिक अत्याचार
ऑल्मपिकमध्ये आपल्या देशासाठी खेळणाऱ्या खेळाडूने एक मोठा खुलासा केला आहे.
मुंबई : ऑल्मपिकमध्ये आपल्या देशासाठी खेळणाऱ्या खेळाडूने एक मोठा खुलासा केला आहे. तिने आपल्या डॉक्टरवरच लैंगिक अत्याचाराचा आरोप लावला आहे. यामुळे पुन्हा एकदा क्रिडा जगतात खळबळ उडाली आहे. खेळात विद्यार्थी कोचनंतर डॉक्टरवर पूर्णपणे अवलंबून असतो. आणि त्यानेच असा प्रकार करणं खरंच धक्कादायक आहे.
अमेरिकी जिम्नॅस्टिक खेळाडू मेकायला मारोनीने जिम्नॅस्टिकचे माजी डॉक्टर लॅरी नासरवर हा मोठा आरोप लावला आहे. बुधवारी मारोनीने एका मुलाखतीत हा मोठा खुलासा केला आहे. मारोनीहे 2012 मध्ये लंडन ऑल्मपिकमध्ये गोल्ड जिंकणाऱ्या संघाचा ही एक भाग होती. तर तीला वैयक्तिक रुपात सिल्वर मिळवणारी ही खेळाडू आहे.
मेकायला मारोनीने सांगितल की, या मुलाखतीत सांगितलं की लैंगिक अत्याचाराची सुरूवात नासरकडून अगदी पहिल्या मुलाखतीतच सुरू झाली होती. तेव्हा तिचं वय फक्त 13 वर्ष होतं. हा प्रकार बऱ्याच दिवस सुरू होतं. मारोनीने सांगितलं की, तो सतत मला पाहत असे.
या अगोदर ही ठरला आहे दोषी
लॅरी नासर या अगोदर ही महिला अॅथलीट यांच्यावर लैंगिक अत्याचार करताना दोषी ठरला आहे. त्याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. एनबीसीला दिलेल्या मुलाखतीत 22 वर्षीय मारोनीने सांगितलं की, सर्वात अगोदर त्याने मला सांगितलं होतं की, त्याला चेकअप करायचं आहे. आणि हीच त्याचा वाईट कृत्याची सुरूवात होती. त्याने मला सांगितलं की, ऑल्मपिकमध्ये जाण्यासाठी अशाप्रकारची तडजोड ही करावीच लागते. त्यामुळे याबाबतीत तू कुणालाच काही सांगणार नाही.
गेबी डगलसने देखील लावला आरोप
ऑल्मपिक चॅम्पिअन जिमनास्ट गेबी डगलस नसरवर आरोप लावताना म्हणाली होती की, ती देखील त्याच ग्रुपचा भाग होती. ज्या डॉक्टरवर आरोप आहेत त्याने माझ्यावर देखील असाच प्रकार केला आहे. 2012 मध्ये गेबी ऑल्मपिक ऑलराऊंडर चॅम्पिअन होती. तसेच तीन वेळा तिने गोल्ड मेडलिस्ट देखील आहे.